आसरअल्ली गटागटाने भरविली जात आहे शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:23 AM2021-07-09T04:23:51+5:302021-07-09T04:23:51+5:30

काेराेना काळात वेगवेगळ्या मार्गाने शिक्षण देण्याचा गुरुजींचा प्रयत्न असला तरी तो फसत आहे. यावर्षीच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. ...

The school is being filled in groups | आसरअल्ली गटागटाने भरविली जात आहे शाळा

आसरअल्ली गटागटाने भरविली जात आहे शाळा

Next

काेराेना काळात वेगवेगळ्या मार्गाने शिक्षण देण्याचा गुरुजींचा प्रयत्न असला तरी तो फसत आहे. यावर्षीच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. १ जून ते १४ ऑगस्ट या कालावधीत ब्रीज काेर्स राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. हा अभ्यासक्रम ऑनलाइनच शिकवायचा आहे. मात्र, आसरअल्ली येथील अनेक पालकांकडे स्मार्टफाेन नाही. तसेच नेटवर्कची समस्या भारी आहे. जिथे फाेनच लागत नाही, तिथे इंटरनेट कुठून मिळणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काेविडचे नियम पाळत गटागटाने बाेलाविले जात आहे. शाळेत गर्दी हाेणार नाही. याची खबरदारी घेतली जात आहे. याबाबतचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला आहे. विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायजर व इतर मदतीचे आश्‍वासन शाळेला देण्यात आले. कोरोनापासून पळणे हा उपाय नसून सुरक्षित पद्धतीने लढणे हाच खरा उपाय आहे. हे आसरअल्ली गावाने एकजुटीने समाजापुढे मांडले आहे. या निर्णयाचे स्वागत होत आहे. ग्राम सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, प्रतिष्ठित नागरिक, युवक, आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी एकमताने निर्णय घेतला आहे. यावेळी मुख्याध्यापक खुर्शीद शेख, सरपंच रमेश तैनेनी, उपसरपंच सुधाकर मिसरी, राजू जैनवार, गजानन कलक्षपवार, ग्रामपंचायत सदस्य सर्वेश्वरराव गुडुरी, त. मु.सा. अध्यक्ष चंद्रशेखर पुलगम, राजू जैंनवार, श्रीकांत सुगरवार, सतीश तिरुनगरी, वेंकना चौधरी, लक्ष्मी अल्लपू, विजय तुमडे, श्रीकांत तोरकरी, रंजित चिंताकाणी, जनार्धन तोगेटी, हेमंत रोड्डावर, श्रीनिवास रंगू आदी उपस्थित हाेते.

Web Title: The school is being filled in groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.