महिनाभरापासून शालेय पुस्तके तालुकास्तरावरच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 05:00 AM2021-09-04T05:00:00+5:302021-09-04T05:00:40+5:30

महिनाभरापूर्वी तालुकास्तरावर असलेल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. तेथून केंद्रस्तरावर पाठ्यपुस्तके पाेहाेचविण्यासाठी पुन्हा दुसरा कंत्राटदार शासनामार्फत नेमला आहे. या कंत्राटदाराने केंद्रस्तरावर पुस्तके पाेहाेचवून दिली नाहीत. केंद्रस्तरावरून पुस्तके मुख्याध्यापकांना घेऊन जायचे आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षीपर्यंत मुख्याध्यापक स्वत: एखादे चारचाकी वाहन भाड्याने करून पुस्तके घेऊन जात हाेते.

School books have been lying on the taluka level for a month now | महिनाभरापासून शालेय पुस्तके तालुकास्तरावरच पडून

महिनाभरापासून शालेय पुस्तके तालुकास्तरावरच पडून

Next

दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शैक्षणिक सत्र सुरू हाेऊन दाेन महिन्यांचा कालावधी उलटत चालला असला तरी अजूनपर्यंत अनेक शाळांना पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला नाही. सर्वच पुस्तके पंचायत समितीस्तरावरील बीईओ कार्यालयात पडून आहेत. विद्यार्थ्यांच्या हातात अजूनपर्यंत पुस्तके मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांचे फार माेठे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. 
सर्वशिक्षा अभियानमार्फत पहिली ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना माेफत शालेय पुस्तकांचा पुरवठा केला जाते. दरवर्षी शाळा सुरू हाेण्यापूर्वीच या पुस्तके शाळास्तरावर उपलब्ध करून दिल्या जात हाेत्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून पुस्तकांचे वितरण केले जात हाेते. यावर्षी मात्र दाेन महिन्यांचा कालावधी उलटूनही पुस्तकं मिळाली नाहीत. 
काेराेनामुळे शाळा बंद असल्या तरी काही शाळा ऑनलाइन शिकवत आहेत. तर काही शिक्षक विद्यार्थ्यांना आळीपाळीने बाेलावून शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पुस्तकच नसल्याने फार माेठी अडचण निर्माण झाली आहे. पुस्तक नसल्याने विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी तयार नाही. 
महिनाभरापूर्वी तालुकास्तरावर असलेल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. तेथून केंद्रस्तरावर पाठ्यपुस्तके पाेहाेचविण्यासाठी पुन्हा दुसरा कंत्राटदार शासनामार्फत नेमला आहे. या कंत्राटदाराने केंद्रस्तरावर पुस्तके पाेहाेचवून दिली नाहीत. केंद्रस्तरावरून पुस्तके मुख्याध्यापकांना घेऊन जायचे आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षीपर्यंत मुख्याध्यापक स्वत: एखादे चारचाकी वाहन भाड्याने करून पुस्तके घेऊन जात हाेते. मात्र यावर्षी ही जबाबदारी शासनाने कंत्राटदारावर साेपविली आहे. त्यामुळेच पुस्तके पाेहाेचविण्यास उशीर हाेत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे.

धानाेरा तालुक्यासाठी पुस्तकेच आली नाही
- धानाेरा तालुक्यासाठी पथदर्शी अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याला तीनच पुस्तके दिली जातात. प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र पुस्तक राहते. या एका पुस्तकात त्या सत्राच्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम राहते. त्यामुळे विद्यार्थ्याला शाळेत एकच पुस्तक धरून जावे लागते. विद्यार्थ्याच्या दफ्तराचा ओझा कमी करणे हा उद्देश आहे. राज्यातील काही निवडक तालुक्यांमध्ये धानाेरा तालुक्याचा समावेश आहे. 

नगर परिषदेच्या शिक्षकांनी स्वत: आणली पुस्तके
कंत्राटदार केंद्रस्तरापर्यंत कधी पुरवठा करणार हे अजूनही निश्चित नाही. गडचिराेली तालुक्याच्या शाळांच्या पुस्तका गडचिराेली येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच ठेवल्या आहेत. या पुस्तका शाळेत नेऊ देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नगर परिषदेच्या काही शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली. शिक्षणाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर गुरूवारी पुस्तके शाळांमध्ये आणण्यात आली आहेत. ही पुस्तके आता विद्यार्थ्यांना वितरित केली जाणार आहे. इतरही शाळांनी हीच पद्धत अवलंबण्याची गरज आहे. 

पालक त्रस्त
काेराेनामुळे मुलाचे शाळेत जाणे बंद आहे, तर दुसरीकडे पाठ्यपुस्तकाही देण्यात आल्या नाही. त्यामुळे एखाद्या पालकाने घरीच शिकविण्याचा प्रयत्न केल्यास पुस्तकच नसल्याने शिकता येत नाही. काही विद्यार्थ्यांना जुन्या पुस्तके दिली आहेत. मात्र या पुस्तके सर्वच विद्यार्थ्यांना मिळाली नाहीत.

 

Web Title: School books have been lying on the taluka level for a month now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.