स्कूल बसला ट्रकची धडक, नऊ विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 09:49 PM2022-03-31T21:49:12+5:302022-03-31T21:49:31+5:30

Gadchiroli News पंक्चर दुरुस्त करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या स्कूल बसला ट्रकने धडक दिल्याने बस उलटून नऊ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली.

School bus hit by truck, nine students injured | स्कूल बसला ट्रकची धडक, नऊ विद्यार्थी जखमी

स्कूल बसला ट्रकची धडक, नऊ विद्यार्थी जखमी

Next
ठळक मुद्देनवेगावजवळ अपघात

 

गडचिराेली : पंक्चर दुरुस्त करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या स्कूल बसला ट्रकने धडक दिल्याने बस उलटून नऊ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. सदर अपघात गडचिराेलीजवळ चंद्रपूर मार्गावरील नवेगाव येथे गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला.

डाेंगरगाव येथील सेंट जाेसेफ नॅशनल स्कूलची एमएच ३३-१०३२ क्रमांकाची बस विद्यार्थ्यांना घेऊन नवेगावकडे जात हाेती. दरम्यान, टायर पंक्चर झाल्याने चालकाने नवेगावजवळ बस उभी करून पंक्चर दुरुस्त करीत हाेता. यावेळी विद्यार्थी स्कूल बसमध्येच बसले हाेते. दरम्यान, छत्तीसगडवरून मूलकडे जात असलेल्या सीजी ०४ एचएस १९६३ क्रमांकाच्या ट्रकने स्कूल बसला मागून धडक दिली.

ही धडक जाेरात बसल्याने स्कूल बस रस्त्याच्या मधाेमध असलेल्या रस्ता दुभाजकावर जाऊन उलटली. या अपघाताच्या वेळी स्कूल बस समाेरून येणाऱ्या सायकलस्वाराला धडकली. त्यामुळे सायकलस्वार जखमी झाला तसेच बसमधील नऊ विद्यार्थी जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. धडक देणारा ट्रक रस्त्यालगत असलेल्या दुकानाच्या दिशेने गेला. पण तिथे असलेल्या विद्युत खांबामुळे ताे अडला.

जखमी विद्यार्थ्यांमध्ये शाैर्य खाेब्रागडे (१२), स्पंदन काेंडावार (१२), प्रतीक समजदार (१५), सुनील भांडेकर (१२), श्रेयस काेंडावार (८), अनुष्का शर्मा (१२), आदिती शर्मा (१३), श्रेया रायपुरे (१३), अव्हिरा कांबळे (४) आदींचा समावेश आहे. गडचिराेली पाेलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, स्कूल बसही जप्त केली आहे.

Web Title: School bus hit by truck, nine students injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात