शाळा १०० टक्के डिजिटल करा

By Admin | Published: March 18, 2017 02:29 AM2017-03-18T02:29:11+5:302017-03-18T02:29:11+5:30

३१ मार्च २०१७ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण शाळा १०० टक्के डिजिटल करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करावा,

School makes 100% digital | शाळा १०० टक्के डिजिटल करा

शाळा १०० टक्के डिजिटल करा

googlenewsNext

रवींद्र रमतकर यांचे आवाहन : आरमोरीतील कार्यशाळेला १५१ शिक्षक उपस्थित
आरमोरी : ३१ मार्च २०१७ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण शाळा १०० टक्के डिजिटल करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करावा, असे आवाहन डायटचे प्राचार्य डॉ. रवींद्र रमतकर यांनी केले.
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या सभागृहात दोन दिवशीय डिजिटल कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला जिल्हाभरातील प्राथमिक शाळांच्या १५१ शिक्षकांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
सदर कार्यशाळेत शाळा डिजिटल करण्यासाठी लागणारे उपकरणे, त्याची माहिती, उपयोग याबाबतची माहिती देण्यात आली. अ‍ॅन्ड्राईट टीव्ही, एलईडी टीव्ही, मिराकास्ट डिवाईस, व्हिडिओ निर्माण करणे, यूट्यूब चॅनल निर्माण करणे तसेच तांत्रिक माहिती, अध्यापनातील वापर व इतर साहित्य निर्मिती आणि विविध शैक्षणिक अप्लिकेशन याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत गुलाब मने, नीलकंठ शिंदे, संतोष मने, विठ्ठल होंडे या तंत्रस्नेही शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सुनंदा गिरपुंजे, सोनाली कंत्रातवार, करूणा बागेसर, अमोल पडोले, विनाश झिलपे आदींनी सहकार्य केले. आरमोरीच्या गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी तालुक्यातील सर्व शाळा १०० टक्के डिजिटल करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शिक्षकांनी केला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: School makes 100% digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.