शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:52 PM2019-07-15T22:52:58+5:302019-07-15T22:53:11+5:30

मानधनात वाढ करावी, यासाठी जिल्हाभरातील शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर १५ जुलै रोजी धडक दिली.

School nutrition workers hit | शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची धडक

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची धडक

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषदेसमोर आंदोलन : मानधनात वाढ करण्याची मागणी; आयटकचे नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मानधनात वाढ करावी, यासाठी जिल्हाभरातील शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर १५ जुलै रोजी धडक दिली.
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ एक हजार रुपये मानधन मिळते. तुटपुंज्या मानधनात कर्मचाऱ्यांना कधीकधी शालेय पोषण आहार तयार करणे, शाळा उघडणे, शाळेची देखभाल करणे, स्वच्छता राखणे, जेवनानंतर विद्यार्थ्यांचे ताट धुणे आदी कामे करावी लागतात. या सर्व कामांमध्ये कर्मचाºयांचा पूर्ण दिवस जातो. कर्मचाºयांना किमान १८ हजार रुपये किमान वेतन द्यावे, आदी मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, अर्थमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना पाठविण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्य महासचिव विनोद झोडगे, जिल्हा उपाध्यक्ष जुबेदा शेख, गणेश चापले, किशोर मडावी, वर्षा गुंफलवार, उषा डांगे, शामलाल आमादार, भिमन्ना तालावार, रेमाजी उरकुडे, पुष्पा मडावी, वंदना नरचुलवार, सारीका वांढरे, रूपाली हेडाऊ, सुरेश बुरांडे यांनी केले. आंदोलनात शेकडो पोषण आहार कर्मचारी सहभागी झाले होते.
इतर राज्यांमध्ये मिळते अधिक मानधन
महाराष्ट्रातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन दिले जाते. याउलट पांडेचेरी राज्यात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मासिक १४ हजार रुपये, केरळमध्ये १० हजार रुपये, तामिळनाडूत ७ हजार ५०० रुपये मानधन दिले जाते. ही बाब राज्य शासनाच्या अनेक वेळा लक्षात आणून देण्यात आली आहे. मात्र अजूनपर्यंत राज्य शासनाने मानधन वाढीसाठी कोणतीही कार्यवाही सुरू केली नाही.

Web Title: School nutrition workers hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.