कृती व निरीक्षणातून विज्ञान शिकावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:25 AM2021-07-10T04:25:24+5:302021-07-10T04:25:24+5:30
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने आयोजित ‘प्रकाशाचे पंख’ या ऑनलाइन संवादमालेमध्ये वक्ते म्हणून ते बाेलत हाेते. डाॅ. ...
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने आयोजित ‘प्रकाशाचे पंख’ या ऑनलाइन संवादमालेमध्ये वक्ते म्हणून ते बाेलत हाेते. डाॅ. पुजारी यांनी ‘फन एक्सपिरीमेंट्स फाॅर टिचिंग सायन्स’ या विषयावर विचार व्यक्त केले. ऑनलाइन संवादमालेच्या चौथ्या सत्राचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरीचे प्राचार्य डॉ.गजानन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डायटच्या वतीने समृद्ध शैक्षणिक नेतृत्व व व्यक्तिमत्त्व विकासाची ऑनलाइन संवादमाला सुरू केली आहे. दर गुरुवारी विविध क्षेत्रात भरीव कामगीरी करणारे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व या संवादमालेत श्रोत्यांशी संवाद साधत आहेत. याचे थेट प्रक्षेपण यू-ट्यूबवर होत आहे.
प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांनी विवेकशील विज्ञानाचे उपासक बनून निसर्गवादी बनणे म्हणजेच खरे विज्ञानवादी बनणे होय, असे विचार मांडले. प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय अधिव्याख्याता मिलिंद अघोर यांनी केला. कार्यक्रमाचे संचालन अधिव्याख्याता पुनीत मातकर यांनी केले.
बाॅक्स
वैज्ञानिक शाेधांच्या रंजक कथांचा वापर
डाॅ. पुजारी यांनी अवकाशात उपग्रह सोडणे, स्पेस शटलमधून अंतराळात जाणे, रॉकेट लॉंच करणे, आदी बाबी कशा घडतात ते प्रतिकृतींच्या माध्यमातून समजावून सांगितले. वैज्ञानिक शोधांच्या रंजक कथा व वेगवेगळे संदर्भ देत कृतीयुक्त विज्ञान अध्यापनाचा उत्तम नमुनाच त्यांनी समोर ठेवला. बोलक्या बाहुल्यांचा मनोरंजक व उद्बोधक वापरही त्यांनी केला.