विद्युत खांब पडल्याने रोवणी खोळंबली

By admin | Published: July 29, 2014 11:47 PM2014-07-29T23:47:52+5:302014-07-29T23:47:52+5:30

येथून जवळच असलेल्या पळसगाव येथील प्रल्हाद शंभरकर यांच्या शेतामध्ये गेल्या १० दिवसांपासून विद्युत खांब कोसळले आहे. यामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाचे कनेक्शन बंद झाले आहे.

The scope of the scrapping of the electric pole | विद्युत खांब पडल्याने रोवणी खोळंबली

विद्युत खांब पडल्याने रोवणी खोळंबली

Next

जोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या पळसगाव येथील प्रल्हाद शंभरकर यांच्या शेतामध्ये गेल्या १० दिवसांपासून विद्युत खांब कोसळले आहे. यामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाचे कनेक्शन बंद झाले आहे. पावसाने उसंत घेतल्यामुळे पाणी पुरवठाअभावी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या रोवणीचे काम बंद पडले आहे. येत्या चार दिवसात विद्युत विभागाने खांब उचलून विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा विद्युत विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जोगीसाखरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी केला आहे.
गेल्या चार वर्षांपासून जोगीसाखरा येथील प्रल्हाद शंभरकर यांच्या शेतात विद्युत खांब वाकलेल्या अवस्थेत होते. १० दिवसापूर्वी रात्रीच्या वेळी हे वाकलेले खांब शेतात कोसळले. मात्र कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. शेतात खांब पडल्यासंदर्भाची माहिती विद्युत विभागाला अनेकदा देण्यात आली. मात्र विद्युत विभागाने सदर खांब उचलून विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी दिरंगाई करीत आहे. जोगीसाखरा परिसरातील पळसगाव येथील २५ टक्के शेतकऱ्यांकडे कृषीपंपाचे कनेक्शन आहे. मात्र खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा बंद झाला आहे.

Web Title: The scope of the scrapping of the electric pole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.