स्काऊट शिक्षणातून उत्तम जीवन जगण्याची प्रेरणा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:48 AM2021-02-25T04:48:46+5:302021-02-25T04:48:46+5:30

गडचिराेली : आधुनिक काळामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. तेव्हाच विद्यार्थी देशाचा उत्तम नागरिक होऊ शकतो. स्काऊट ...

Scout education inspires us to live a better life | स्काऊट शिक्षणातून उत्तम जीवन जगण्याची प्रेरणा मिळते

स्काऊट शिक्षणातून उत्तम जीवन जगण्याची प्रेरणा मिळते

Next

गडचिराेली : आधुनिक काळामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. तेव्हाच विद्यार्थी देशाचा उत्तम नागरिक होऊ शकतो. स्काऊट चळवळीच्या माध्यमातून योग्यप्रकारे जडणघडण होऊन उत्तम जीवन जगण्याची विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांनी केले. गडचिरोली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्यावतीने चारदिवसीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आयुक्त गाईड (रेंजर) कविता पोरेड्डीवार हाेत्या. स्काऊट कालिदास बन्सोड, गाईड सुधा सेता, जिल्हा संघटक नीतेश झाडे, रमेश पुराम, सहायक दीपा मडावी, गाईड कांचन बोकडे, मंदा क्षीरसागर, नितूराणी मालाकर, जीजा राणे, भावना बैस, आशा करोडकर, जितेंद्र गव्हारे, राजेंद्र सावरबांधे, प्रमोद पाचभाई, श्रीकृष्ण ठाकरे उपस्थित होते.

या चाचणी शिबिरात ५ स्काऊट, ३१ गाईड, १ स्काऊटर, ४ गाईडर, असे एकूण ४१ स्काऊट आणि गाईड यांनी भाग घेतला.

Web Title: Scout education inspires us to live a better life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.