मूर्त्यांना फासला शेंदूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 10:28 PM2017-12-24T22:28:41+5:302017-12-24T22:29:06+5:30
भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे मुख्य अभियंता कॅम्पे गौंडा यांनी नुकतीच वैरागड येथील भंडारेश्वर मंदिराला भेट देऊन मंदिराची पाहणी केली. येथील दगडांवर कोरलेल्या मूर्तींचे सौंदर्यीकरण दीर्घकाळ टिकण्यासाठी मूर्त्यांवर पुजेचे साहित्य टाकू नका अशा सूचना दिल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे मुख्य अभियंता कॅम्पे गौंडा यांनी नुकतीच वैरागड येथील भंडारेश्वर मंदिराला भेट देऊन मंदिराची पाहणी केली. येथील दगडांवर कोरलेल्या मूर्तींचे सौंदर्यीकरण दीर्घकाळ टिकण्यासाठी मूर्त्यांवर पुजेचे साहित्य टाकू नका अशा सूचना दिल्या होत्या. परंतु दौऱ्यानंतरच्या आठ दिवसातच मंदिरातील मूर्त्यांवर शेंदूर फासण्यात आले आहे.
कोणत्याही ऐतिहासिक वास्तूची देखभाल करण्याची जबाबदारी पुरातत्त्व विभागाबरोबरच स्थानिक नागरिकांची असते, असे पुरातत्त्व विभागाचे मुख्य अभियंता कॅम्पे गौंडा यांनी स्पष्ट करून मंदिरावर किंवा मंदिर परिसरातील मूर्त्यांचे सौंदर्य दीर्घकाळ कायम राहण्यासाठी कोरीवर मूर्त्यांवर पूजेचे साहित्य टाकण्यास मनाई केली होती. परंतु अशा सूचना देऊन आठ दिवस लोटत नसताना दर्शनासाठी येणाºया भाविकांनी मंदिरातील कोरीव मूर्तीवर तसेच परिसरातील मूर्तीवर शेंदूर फासले. मूर्त्यांवर पूजेचे साहित्य टाकल्याने या साहित्यातील रासायनिक पदार्थांचा विपरित परिणाम होऊन मूर्त्या ठिसूळ होतात. त्यानंतर नष्टही होतात, असे शिल्प तज्ज्ञांचे मत आहे. भंडारेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या बोअरवेलचे पाणी अधिक क्षारयुक्त आहे. दर्शनाला येणारे भाविक या बोअरवेलमधील पाण्याचा अभिषेकासाठी वापर करतात. त्यामुळे भंडारेश्वर देवस्थानातील मूर्त्या काळ्या व पिवळ्या पडल्या आहेत.
भंडारेश्वर मंदिराची वास्तू पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येत असून वास्तू संवर्धनासाठी अनेक अटी व नियम आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाºया भाविकांनी पुरातत्त्व विभागाने ठरवून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करावे. मंदिरातील तसेच परिसरातील कोणत्याही मूर्त्यांवर पूजेचे साहित्य टाकू नये. सोबतच क्षारयुक्त पाण्याचा अभिषेकासाठी वापर करू नये. नियमांचे पालन केल्यास वास्तू दीर्घकाळ टिकेल, असे भंडारेश्वर समितीने म्हटले आहे.