एसडीपीओंनी घेतली नक्षल कुटुंबाची भेट
By Admin | Published: December 27, 2015 01:48 AM2015-12-27T01:48:37+5:302015-12-27T01:48:37+5:30
उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी तालुक्यातील देचलीपेठा परिसरातील शेडा या गावातील नक्षल कुटुुंबाची भेट घेऊन त्यांना आत्मसमर्पण योजनेचे महत्त्व पटवून दिले.
नवजीवन-२ : आत्मसमर्पण योजनेची माहिती
अहेरी : उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी तालुक्यातील देचलीपेठा परिसरातील शेडा या गावातील नक्षल कुटुुंबाची भेट घेऊन त्यांना आत्मसमर्पण योजनेचे महत्त्व पटवून दिले.
शेडा येथील रूपेश ऊर्फ सांबा गोसाई मडावी हा २००७-०८ मध्ये नक्षलमध्ये गेला होता. तेव्हापासून आजपर्यंत तो नक्षलमध्येच सहभागी आहे. सध्या तो कंपनी क्रमांक १० चा कमांडर म्हणून काम करीत आहे. एसडीपीओ अण्णासाहेब जाधव यांनी नवजीवन-२ या योजनेंतर्गत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रूपेशच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना आत्मसमर्पण योजनेचे महत्त्व पटवून दिले. कुटुुंबीयांना भेट वस्तू दिल्या व गावकऱ्यांकडून गावाच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी अण्णासाहेब जाधव यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक गभाले, वांगणेकर, शिंदे, देचलीपेठा उपपोलीस ठाण्याचे व विशेष अभियान पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)