झिमेलावासीयांच्या मदतीला धावून आले एसडीपीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:24 AM2021-07-21T04:24:44+5:302021-07-21T04:24:44+5:30

मागील अनेक वर्षांपासून झिमेला येथील नाल्यावर पूल नसल्याने पावसात तेथील नागरिकांना जीव धोक्यात घालून नाला पार करावा लागत होता. ...

SDPO rushed to the aid of Jhimela residents | झिमेलावासीयांच्या मदतीला धावून आले एसडीपीओ

झिमेलावासीयांच्या मदतीला धावून आले एसडीपीओ

Next

मागील अनेक वर्षांपासून झिमेला येथील नाल्यावर पूल नसल्याने पावसात तेथील नागरिकांना जीव धोक्यात घालून नाला पार करावा लागत होता. ही व्यथा नागरिकांनी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या लक्षात आणून दिली असता, जि. प. अध्यक्ष यांनी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला. परंतु, पुलाचे काम सुरू असताना रहदारीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक हाेते. मात्र, कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केले. झिमेलावासीयांना दरवर्षीपेक्षा यंदा नाल्याच्या आजूबाजूला खोदकाम आणि माती पडून असल्यामुळे जास्त त्रास होऊ लागला हाेता. पाण्यातून वाट काढून जीवघेणा प्रवास सुरूच होता. ‘लोकमत’ने झिमेलावासीयांच्या व्यथेची बातमी प्रकाशित करताच येथील नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी राजाराम खांदलाचे पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे यांना वाहतुकीची समस्या तत्काळ सोडविण्याचे आदेश दिले. काेल्हे यांच्या विनंतीवरून संबंधित कंत्राटदार यांनी आपली चूक मान्य करून तत्काळ जेसीबीच्या साहाय्याने माती टाकून झिमेला गावाकडे चार चाकी आणि टू व्हीलरची सुरळीत वाहतूक होईल असा मार्ग तयार करून दिला.

190721\1838img-20210718-wa0052.jpg

झिमेला वासियांच्या मदतीला धावून आले अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, लोकमत च्या बातमीची घेतली दखल

Web Title: SDPO rushed to the aid of Jhimela residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.