महिला शेतकऱ्यांना हंगाम नियोजनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:41+5:30
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत पीक पद्धतीवर आधारित धान पीक लागवड व नियोजनाचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. ढोरगट्टा येथील शेतीशाळेत दुसरी शेतीशाळा घेण्यात आली. यात धान, तूर, बियाणे व जिवाणू संवर्धके वितरित करण्यात आली. तसेच बीज प्रक्रिया, गादीवाफे तयार करून रोपे लागवडीची माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : खरीप हंगामातील धानाची खरेदी अंतिम टप्यात आहे. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने धान पेरणी न करता तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक शेती करावी, याकरिता पेंढरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी ढोरगट्टा येथे शेतीशाळा घेण्यात आली. याप्रसंगी महिला शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत पीक पद्धतीवर आधारित धान पीक लागवड व नियोजनाचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. ढोरगट्टा येथील शेतीशाळेत दुसरी शेतीशाळा घेण्यात आली. यात धान, तूर, बियाणे व जिवाणू संवर्धके वितरित करण्यात आली. तसेच बीज प्रक्रिया, गादीवाफे तयार करून रोपे लागवडीची माहिती दिली. सोबतच दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक कृषी सहायक दिनेश पानसे यांनी करून दाखविले. धान लागवडीच्या पद्धती, निंबोळी अर्क, बिजामृत, जिवामृत, विविध जैैविक/जिवाणू खते, जैैविक तननाशके तयार करणे, सेंद्रीय शेती, बांधावर तूर लागवड याविषयी माहिती देण्यात आली.
शेतीशाळेत २५ प्रशिक्षणार्थी महिलांचे गट पाडून सांघिक खेळही घेण्यात आले. शेतीशाळेच्या यशस्वीतेसाठी गाव पाटील धुडसू उसेंडी, सुरेंद्र चौधरी, राणू गावडे, साधू उसेंडी, सुरेखा उसेंडी, सोनी उसेंडी, कविता दुगा, गुरूदास मडावी यांनी सहकार्य केले.