मावा-तुडतुड्याच्या मदतीचा दुसरा हप्ता पोहोचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:39 AM2018-07-18T00:39:14+5:302018-07-18T00:39:25+5:30
गेल्या खरीप हंगामात मावा-तुडतुडे आणि बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे दिल्या जाणाºया मदतीचा दुसरा हप्ता म्हणून १३ कोटी ८२ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम तहसीलदारांकडे वळती करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या खरीप हंगामात मावा-तुडतुडे आणि बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे दिल्या जाणाºया मदतीचा दुसरा हप्ता म्हणून १३ कोटी ८२ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम तहसीलदारांकडे वळती करण्यात आली आहे. या रकमेत सर्वाधिक ४ कोटी २९ लाख ९० हजार रुपये चामोर्शी तालुक्याला आणि ३ कोटी ३५ लाख १८ हजार रुपये आरमोरी तालुक्याला मिळणार आहेत.
जिल्ह्यातील ६९ हजार ५१५ धान व कापूस उत्पादक शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले होते. त्यांना ३४ कोटी ५४ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. त्यात ३४ कोटी १२ लाख धानपिकासाठी तर ४१ लाख ३६ हजार कापूस पिकाच्या नुकसानीसाठी आहेत. ही मदतीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी ११ कोटी ५१ लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र प्रत्यक्षात ९ कोटी २० लाख रुपयेच मिळाले. त्या पहिल्या टप्प्यातील बाकी असलेले २ कोटी ३१ लाख आणि दुसºया हप्त्याची रक्कम म्हणून ११ कोटी ५१ लाख रुपये असे एकूण १३ कोटी ८२ लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले.
या रकमेतून कोणत्या तालुक्याला किती मदत वाटायची हे निश्चित करून तेवढी रक्कम तहसीलदारांकडे वळती करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसात ही सर्व रक्कम संबंधित शेतकºयांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. या रकमेचे पूर्ण वाटप झाल्यानंतर मदतीचा तिसरा हप्ता मिळणार आहे.