अहेरी तालुक्यात दुसऱ्यांदा कापूस बियाणांवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:25 AM2021-06-11T04:25:20+5:302021-06-11T04:25:20+5:30

गेर्रा येथील राकेश सडमेक यांच्या घरी हे प्रतिबंधित बियाणे ठेवले असल्याची गाेपनीय माहिती पोलीस विभाग व कृषी विभागाच्या ...

Second raid on cotton seeds in Aheri taluka | अहेरी तालुक्यात दुसऱ्यांदा कापूस बियाणांवर धाड

अहेरी तालुक्यात दुसऱ्यांदा कापूस बियाणांवर धाड

googlenewsNext

गेर्रा येथील राकेश सडमेक यांच्या घरी हे प्रतिबंधित बियाणे ठेवले असल्याची गाेपनीय माहिती पोलीस विभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी राकेश सडमेकच्या घरी धाड टाकली. त्याच्या घरी दहा पोत्यांमध्ये भरून ठेवलेले कुठलेही वेष्टण /पॅकिंग नसलेले अवैध ४३० कि.ग्रॅ. खुले बियाणे आढळून आले. शासकीय दराने त्याची किंमत ७ लाख ४१ हजार ५११ रुपये हाेते. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बियाणांचे निरीक्षण केले असता, सदर साठा पूर्णपणे अवैध व विनापरवाना शासन मान्यता नसलेला आढळला. हे बियाणे प्रतिबंधित एचटीबीटी असण्याची शक्यता आहे. सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन अहेरी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आराेपी राकेश सडमेक हा फरार आहे. त्याच्या विराेधात भादंवि कलम ४२०, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील तरतुदींनुसार तक्रार दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कृषी विभागाच्या तालुका भरारी पथकाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी संदेश खरात, कृषी अधिकारी प्रदीप राऊत तसेच पोलीस विभागातील बिट अंमलदार देवीदास मानकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक आरती नरोटे करीत आहेत.

===Photopath===

100621\img-20210610-wa0188.jpg

===Caption===

अहेरी तालुक्यातील गेरर्या येथे मिळालेले अवैध कापूस बियाणं

Web Title: Second raid on cotton seeds in Aheri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.