खड्ड्याने घेतला दुसरा बळी

By admin | Published: October 23, 2016 01:30 AM2016-10-23T01:30:27+5:302016-10-23T01:30:27+5:30

वाहन खड्ड्यात गेल्यामुळे अपघात होऊन एक इसम जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास देसाईगंज-लाखांदूर मार्गावर घडली.

The second victim took the pothole | खड्ड्याने घेतला दुसरा बळी

खड्ड्याने घेतला दुसरा बळी

Next

प्रशासनाचे दुर्लक्ष : देसाईगंज-लाखांदूर मार्गाची दुरवस्था
देसाईगंज : वाहन खड्ड्यात गेल्यामुळे अपघात होऊन एक इसम जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास देसाईगंज-लाखांदूर मार्गावर घडली. मनिराम सोनकुसरे रा. चिचोली (भागडी) ता. लाखांदूर जि. भंडारा असे मृतक इसमाचे नाव आहे.
आत्माराम सोनकुसरे हे लाखांदूर येथील सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक म्हणून कार्यरत होते. २००८ मध्ये ते या पदावरून सेवानिवृत्त झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झालेल्या रस्त्यावरील खड्ड्याने घेतलेला हा दुसरा बळी आहे. विशेष म्हणजे सदर दोन्ही घटना आॅक्टोबर महिन्यात घडल्या. देसाईगंज-ब्रह्मपुरी, देसाईगंज-लाखांदूर, देसाईगंज-कुरखेडा या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून आजवर या तिन्ही मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. १६ फेब्रुवारी २०१६ ला देसाईगंजच्या विश्रामगृहाजवळ दोन इसमांचा खड्ड्यांमुळे जीव गेला. चार दिवसानंतर वन विभागातील अकबर पठाण नामक व्यक्तीला वाहनाने धडक दिल्याने तेही ठार झाले. ६ आॅक्टोबर २०१६ रोजी बैद्यनाथ कारखान्याजवळ मंगला देविदास शेंडे नामक युवतीचा अपघाताने मृत्यू झाला. तर पुन्हा याच मार्गावर खड्ड्यात वाहन गेल्याने आत्माराम मनिराम सोनकुसरे यांचा मृत्यू झाला. सदर अपघातातील दुचाकीचा क्रमांक एमएच-३६-क्यू-७३७५ असा आहे. सोनकुसरे हे सदर क्रमांकाच्या दुचाकीने देसाईगंजकडे येत असताना खड्ड्यात वाहन गेल्याने मेंदुला जबर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले.
देसाईगंज शहरातील मुख्य मार्गावर अपघाताची मालिका कायम आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. दुरवस्था झालेल्या प्रमुख मार्गाची तत्काळ दुस्ती करावी, अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमगाववासीयांनी दिला आहे. हा मार्ग गडचिरोली आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग आहे. या महामार्गावर आंतरराज्यीय वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर राहते. (प्रतिनिधी)

Web Title: The second victim took the pothole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.