सुगंधित तंबाखूसह खºर्याचे साहित्य केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 05:00 AM2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:01:12+5:30
जिल्ह्यात लपून छापून किराणा दुकानांमध्ये असे पदार्थ विकले जात आहे. हा प्रकार थांबावा यासाठी मुक्तिपथद्वारे गाव संघटनांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. बुधवारी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दुकानांची तपासणी करून असे साहित्य जप्त करण्यात आले. त्याचबरोबर शासनाच्या आदेशाचे पालन करून आरोग्याला होणारा धोका टाळण्याचे आवाहनही करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री न करण्याचे आदेश असतानाही नियमांचे उल्लंघन करून विक्री करणाऱ्यांच्या दुकानातील तंबाखूजन्य पदार्थांचे मोठे साठे व खर्रा बनविण्याचे साहित्य मुक्तिपथ गाव संघटन, पोलीस पाटील आणि तालुका चमूने नष्ट केले. ही कारवाई गडचिरोली, चामोर्शी, धानोरा, मुलचेरा आणि भामरागड तालुक्यात करण्यात आली.
जिल्ह्यात लपून छापून किराणा दुकानांमध्ये असे पदार्थ विकले जात आहे. हा प्रकार थांबावा यासाठी मुक्तिपथद्वारे गाव संघटनांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. बुधवारी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दुकानांची तपासणी करून असे साहित्य जप्त करण्यात आले. त्याचबरोबर शासनाच्या आदेशाचे पालन करून आरोग्याला होणारा धोका टाळण्याचे आवाहनही करण्यात आले.
मुलचेरा तालुक्यात विजयनगर व कोपरअली चेक येथील किराणा दुकानांची तपासणी केली असता सुगंधित तंबाखू, सुपारी आणि खर्रा बनविण्याचे साहित्य आढळले. हे सर्व साहित्य ताब्यात घेत नष्ट करण्यात आले. दुर्गम अशा भामरागड तालुक्यातील बोटनफुंडी, ताडगाव, कोठी, नारगुंडा, केडमारा या गावातील दुकानांची गाव संघटनेच्या सहकार्याने पाहणी केली असता सुगंधित तंबाखू, खर्रा पन्नी, सुपारी असे साहित्य सापडले. या साहित्याची होळी करण्यात आली. चामोर्शी तालुक्यातील प्रियदर्शिनी या गावी डेली निड्सचे दुकान लावून त्या आड खर्रा विकणाºयाची चौकशी केली. यावेळी मझा तंबाखूचे डबे आणि सुपारी सापडली. हा सर्व मुद्देमाल नष्ट करण्यात आला. त्याचबरोबर धानोरा तालुक्यातील येरकळ, मुरूमगाव, सावरगाव येथे पोलिसांनीच किराणा दुकानांची तपासणी करून तंबाखूजन्य साहित्य न विकण्याची तंबी दिली. बेलगाव आणि जपतलाई येथे सापडलेल्या तंबाखूजन्य साहित्याची मुक्तिपथ चमूने होळी केली. त्याचबरोबर कुरखेडा तालुक्यातील तळेगाव आणि अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू येथेही साहित्य जप्त करण्यात आले.
गडचिरोली तालुक्यातील मारोडा येथील एक इसम पानठेल्याच्या आत बसून बंद दार बंद करून खर्राविक्री करीत असल्याचे गाव संघटना आणि मुक्तिपथ तालुका चमुच्या लक्षात आले. या पानठेल्याची तपासणी केली असता हा इसम मुद्देमालासह खर्रा तयार करताना आढळला. त्याच्याकडील सुगंधित तंबाखूचे सहा डबे, खर्रा पन्नी आणि तब्बल १२ किली सुपारी ताब्यात घेत नष्ट करण्यात आली. कोरोनाच्या संचारबंदीत मुक्तिपथच्या वतीने दारू व तंबाखूविरूद्ध कारवाई होत असली तरी पोलीस व महसूल प्रशासनाकडून ठोस कारवाई होत असल्याचे दिसून येत नाही.
कोंढाळा येथे तीन ड्रम मोहसडवा पकडून केला नष्ट
जमिनीखाली लपवून ठेवलेला तब्बल तीन ड्राम मोहसडवा मुक्तिपथ गाव संघटन आणि कोरोना पथकातील युवांनी शोधून नष्ट केला. बुधवारी कोंढाळा येथे ही अहिंसक कृती झाली. दारूविक्री न करण्याची तंबी गाव संघटनेने विक्रेत्यांना दिली. कोंढाळा येथील मुक्तिपथ गाव संघटन आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या पुढाकाराने दारूविक्री बंदीचा ठराव घेण्यात आला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी येथील युवांचे कोरोना पथकही तयार करण्यात आले आहे. या पथकाने जंगल परिसरात असलेल्या दारूभट्याही यापूर्वीही उद्ध्वस्त केल्या. असे असतांनाही गावातील काही जण दारू गाळून त्याची विक्री करीतच आहे. अशाच काही घरांनी मोहाचा सडवा टाकण्याची माहिती मिळाली. मुक्तिपथ गाव संघटन, तालुका चमू आणि कोरोना पथकातील युवांनी त्यांच्या घराजवळील परिसर खोडून काढला असता तीन ड्राम मोहसडवा सापडला. हा सडवा नष्ट करण्यात आला. मुक्तिपथ गाव संघटनेचे अध्यक्ष नितीन राऊत, सरपंच मंगला शेंडे, पोलीस पाटील किरण कुंभलवार, कोरोना समितीचे दुगेश्वर वारंभे, देवदास नागोसे यांची यावेळी उपस्थिती होते. जिल्ह्यात दारूबंदी असल्याने दारू गाळणे हा गुन्हा आहे. त्यातच सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे दारू गाळणे कायमचे बंद करण्याची तंबी विक्रेत्यांना देण्यात आली.