वाहनासह सात लाख रुपयांचा दारूसाठा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:33 AM2021-01-21T04:33:27+5:302021-01-21T04:33:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क घाेट : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घाेट पाेलिसांनी घाेट-चामाेर्शी मार्गे रेगडीकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनाला अडवून ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
घाेट : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घाेट पाेलिसांनी घाेट-चामाेर्शी मार्गे रेगडीकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनाला अडवून वाहनासह ७ लाख १६ हजार २०० रुपयांचा दारूसाठा पकडला. ही कारवाई १७ जानेवारी राेजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास निकतवाडा येथे करण्यात आली. पण तीन दिवस पोलिसांनी या कारवाईचा उलगडा केला नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
एचआर ५ एचए ४४९२ क्रमांकाच्या चार चाकी वाहनातून चामाेर्शी मार्गे रेगडीकडे विदेशी दारूची तस्करी सुरू हाेती. दरम्यान, घाेट पाेलिसांना सुगावा लागताच त्यांनी या वाहनावर पाळत ठेवून निकतवाडा येथे वाहन अडवून दारू पकडली. वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये आयबी कंपनीच्या १६८ नग बाॅटल, एमएल आयबी कंपनीच्या ३५ नग असा एकूण १ लाख १६ हजार २०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी आराेपी प्रीतम साधुराम सिंह (४०, रा. बसवाडा जि. करनाल), विकास देवेंदर कुमार (३६, रा. करनाल - हरयाणा) यांना अटक करण्यात आली. साेमवारी आराेपींना चामाेर्शीच्या न्यायालयात हजर केले असता, पाेलीस काेठडी सुनावण्यात आली त्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन काेठडी सुनावली व त्यांची चंद्रपूर कारागृहात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई उपविभागीय पाेलीस अधिकारी भाऊसाहेब ढाेले यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक संदीप राेढे, पाेलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, जनार्धन काळे व पाेलीस कर्मचाऱ्यांनी केली.