५७४२ मतदार करणार १९ संचालकांची निवड
By Admin | Published: May 15, 2016 01:24 AM2016-05-15T01:24:13+5:302016-05-15T01:24:13+5:30
जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या. भंडारा/गोंदियाच्या सार्वत्रीक निवडणूक १५ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान होत आहे.
आज निवडणूक : भंडारा-गोंदिया शासकीय कर्मचारी पतसंस्था
गोंदिया : जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या. भंडारा/गोंदियाच्या सार्वत्रीक निवडणूक १५ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान होत आहे. १९ जागांसाठी एकता, प्रगती व सहकार ह्या तीन पॅनल रिंगणात आहेत. या पॅनलला काहींचा पाठींबा आहे.
गोंदिया जिल्ह्यात एक हजार ८५७ मतदार तर भंडारा जिल्ह्यात ३ हजार ८८५ मतदार आहेत. १९ पैकी पाच जागा गोंदिया जिल्ह्याला आहेत. तर उर्वरीत १४ जामा भंडारा जिल्ह्यात आहेत. या संस्थेवर मागील दोन पंचवार्षीक म्हणजे १० वर्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वर्चस्व होते. सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात आला. नियमीत कर्ज मर्यादाआठ लाख करण्यात आली. आकस्मीक कर्ज २० हजार करण्यात आले.
१०० कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या या संस्थेच्या निवडणुकीत यंदा चुरस निर्माण झाली आहे. ज्या संघाचे वर्चस्व होते त्याच संघातील काही लोक फुटले. जागांच्या वाटाघाटीसाठी जागांसाठी मतभेद झाले. गोंदिया संघाने जिल्हा स्तरावरच्या सहा पैकी तीन जागा मागीतल्या परंतु त्यांनी दोनच द्यायची तयारी दर्शविलीे. परिणामी तणाव निर्माण झाला. यातच दोन गट पडले. ही फाटाफूट सहा महिन्यापूर्वीपासून नियोजित होती अशी चर्चा आहे. (तालुका प्रतिनिधी)
मतदारांसाठी वचननामा आकर्षक
जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या. भंडारा/गोंदियाच्या सार्वत्रीक निवडणूकीत मतदारांनी आपल्या उमेदवारांना मतदान करावे यासाठी प्रत्येक पॅनलने आकर्षक वचननामा तयार करून मतदारांपर्यंत पोहचविला आहे. परंतु ज्यांच्या वचननाम्याकडे जास्त लोक आकर्षीत होतील त्या पॅनलचे उमेदवार विजयी ठरतील.
$$्निेगोधुली बेलापर मतदारांचे ‘पाणीग्रहण’
गोंदिया जिल्हा मध्य प्रदेश व छत्तीसगडला लागून असल्याने अनेक हिंदी लग्न पत्रिकेत ‘गोधुलीबेला पे पाणीग्रहण होगा’ असे लिहिलेले असते. असेच गोधुलीबेला (सायंकाळी) बिअरबार मधील पाणीग्रहण करण्यासाठी उमेदवारांकडून मतदारांना पाचारण केले जाते. त्यामुळे बिअरबार सायंकाळी भरलेले दिसत आहेत.