तुषार फालेची संरक्षण दलात निवड

By admin | Published: June 16, 2017 12:52 AM2017-06-16T00:52:31+5:302017-06-16T00:52:31+5:30

गडचिरोली येथील तुषार फाले यांची संरक्षण दलात अधिकारी पदावर निवड झाली आहे.

Selection in Tusshar Fleet Protection Force | तुषार फालेची संरक्षण दलात निवड

तुषार फालेची संरक्षण दलात निवड

Next

२१ व्या वर्षी भरारी : युवकांसाठी प्रेरणादायी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली येथील तुषार फाले यांची संरक्षण दलात अधिकारी पदावर निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कम्बाईन डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अवघ्या २१ व्या वर्षी त्याने मिळविलेले हे यश मागास जिल्ह्यातील नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
गडचिरोलीच्या कारमेल शाळेत त्याने शालेय शिक्षण घेतले. त्यानंतरचे उच्च शिक्षण त्याने नागपूर येथे घेतले. वडील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात शाखा अभियंता आहेत तर आई गृहिणी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस एक्झॅमिनेशन (२) २०१६ चा निकाल घोषित झाला आहे. यामध्ये देशभरातून आर्मीकरिता ४ हजार ११८ तर इंडियन नेवी करिता २ हजार ४८८ विद्यार्थी लेखी परीक्षेत पात्र ठरले. त्यानंतर मुलाखती व मेडिकल टेस्ट घेण्यात आल्या. तुषार हा आर्मीच्या परीक्षेत १६ वा तर नेवीत ७ वा मेरिट आला आहे. दोन महिन्यांपूर्वीच सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाकडून घेण्यात आलेल्या भारतीय वायू सेनेतही त्याची निवड झाली होती.
गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील विद्यार्थ्याने संरक्षण दलाच्या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. जिल्ह्यातील युवकांसाठी ही बाब निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे. बालपणापासूनच संरक्षण दलात नोकरी करण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. त्यामुळे इंजिनिअरिंग करीत असताना अनेक कंपन्यांच्या नोकरीच्या संधी त्याने स्पष्टपणे नाकारल्या. तुषारने आपल्या यशाचे श्रेय आईवडील, सुनील देशपांडे, शिवाली देशपांडे यांना दिले आहे.

Web Title: Selection in Tusshar Fleet Protection Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.