भारनियमनाविरोधात सेनेचा तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:51 PM2017-09-20T23:51:03+5:302017-09-20T23:51:13+5:30

भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने वीज भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय प्रत्येक वस्तूंची भाववाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत.

Sena's Tehsil Morcha against the weightlifting | भारनियमनाविरोधात सेनेचा तहसीलवर मोर्चा

भारनियमनाविरोधात सेनेचा तहसीलवर मोर्चा

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना मागण्यांचे निवेदन : महागाईविरोधातही शिवसैनिक आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने वीज भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय प्रत्येक वस्तूंची भाववाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. या मुद्यावर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक होत बुधवारी कुरखेडाच्या तहसील कार्यालयावर धडक दिली.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख निरांजनी चंदेल, तालुका प्रमुख आशिष काळे, शहर प्रमुख संजय देशमुख, कामगार सेना प्रमुख नरेंद्र तिरनकर, नगरसेवक नानक मनुजा, पुंडलिक देशमुख, विजय पुस्तोडे, रमेश कुथे, प्रभू शिवलवार, अनिल उईके, अशोक कंगाले, नगरसेविका अनीता बोरकर, चित्र गजभिये, गोलू धांडे, भास्कर देशमुख, दिगंबर नाकाडे, महिला तालुका प्रमुख शारदा गाथाडे, शहर प्रमुख कविता खडसे, उपशहर प्रमुख अश्विनी पिंपळकर, पुरूषोत्तम तिरगम, दशरथ लाडे, लोमेश कोटांगले, गुणवंत दडमल, तुकाराम मडकाम, खुशाल बन्सोड यांच्यासह शेकडो शिवसैैनिक उपस्थित होते.
भाजपच्या विद्यमान सरकारतर्फे पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती सातत्याने वाढविल्या जात आहेत. राशन दुकानातील साखरही कमी करण्यात आली आहे. या सरकारच्या काळात धानाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे, आदी मुद्यांवर शिवसैनिक आक्रमक झाले.
 

Read in English

Web Title: Sena's Tehsil Morcha against the weightlifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.