उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:36 PM2019-02-04T22:36:44+5:302019-02-04T22:37:06+5:30
जि.प.च्या प्राथमिक विभागाचे वादग्रस्त उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांच्या निलंबन कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवा. निलंबन होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, असे निर्देश शिक्षक आमदार नागो गाणार यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जि.प.च्या प्राथमिक विभागाचे वादग्रस्त उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांच्या निलंबन कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवा. निलंबन होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, असे निर्देश शिक्षक आमदार नागो गाणार यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांना दिले.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांबाबत सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) मारोती चलाख यांच्या प्रकरणावर वादळी चर्चा करण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी नागपूर विभागाचे आमदार प्रा. अनिल सोले, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक शरदचंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांच्या विविध समस्यांकडे जिल्हा परिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, असे सांगत अधिकाºयांच्या कार्यप्रणालीबाबत आमदार गाणार यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्व शिक्षा अभियानातील शौचालय बांधकाम घोटाळा, वेतन विलंब, उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांची जिल्ह्याबाहेर बदली करणे, नियमित व स्थायी प्रकरणे निकाली काढणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीला शिक्षक परिषदेच्या राज्य महिला अध्यक्ष पूजा चौधरी, नागपूर विभागाचे अध्यक्ष के. के. वाजपेयी, चंद्रपूरचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, राज्य उपाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, जिल्हाध्यक्ष विजय साळवे, जिल्हा कार्यवाह प्रमोद खांडेकर, एस. पी. मेश्राम, दीपक नागपूरवार, निकेश खोब्रागडे आदी उपस्थित होते.