काेराेनाची लस घेण्यात ज्येष्ठ नागरिक पुढेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:32 AM2021-03-14T04:32:45+5:302021-03-14T04:32:45+5:30
बाॅक्स महिलांचाही पुढाकार ज्येष्ठ नागरिकांमध्ये पुरुषांबराेबरच महिलाही लस घेत असल्याचे दिसून येत आहे. लस घेणाऱ्या एकूण नागरिकांमध्ये महिलांची संख्या ...
बाॅक्स
महिलांचाही पुढाकार
ज्येष्ठ नागरिकांमध्ये पुरुषांबराेबरच महिलाही लस घेत असल्याचे दिसून येत आहे. लस घेणाऱ्या एकूण नागरिकांमध्ये महिलांची संख्या निम्मी आहे. पती व पत्नी दाेघेही लस घेत आहेत.
बाॅक्स
तरुणांपेक्षा ज्येष्ठ एक पाऊल पुढे
सुरुवातीच्या कालावधील आराेग्य विभाग, पाेलीस, पंचायत विभागातील नागरिकांना लस दिली जात हाेती. शरीराने धष्टपुष्ट असलेले कर्मचारी लस घेण्यास धजावत नव्हते. नंबर लागूनही लस घेण्यास जात नव्हते. अजूनही अनेकांनी लस घेतली नाही. ज्येष्ठ नागरिक मात्र स्वत:हून लस घेण्यास पुढे येत आहेत. स्वत: रुग्णालयात जाऊन नाेंदणी करून लस घेत आहेत.
आणखी १५ हजार लस उपलब्ध
शुक्रवारी गडचिराेली जिल्ह्याला पुन्हा १५ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्याला एकूण ५४ हजार लस उपलब्ध झाल्या हाेत्या. त्यापैकी २३ हजार लस देण्यात आल्या आहेत, तर ३१ हजार लस शिल्लक आहेत.
काेट
मी लस घेतील तुम्हीही घ्या
काेराेना लसविषयी काहीच भीती बाळगण्याची गरज नाही. मी व पत्नी दाेघांनीही लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर काेणताही त्रास जाणवला नाही. रुग्णालयात ज्येष्ठांना अतिशय आदरपूर्वक वागणूक दिली जाते.
डी. डी. साेनटक्के
सल्लागार, ज्येष्ठ नागरिक संस्था
काेट
काेराेनापासून ज्येष्ठ नागरिकांनाच माेठा धाेका आहे. त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आवर्जून लस घ्यावी. लस घेण्यासाठी नाेंदणीची प्रक्रिया अतिशय साेपी आहे. लस घेतल्यानंतर काेणताही त्रास जाणवत नाही.
प्रभाकर वासेकर,
मुख्य प्रशासक, कृउबास गडचिराेली
१६,१५३
जणांनी आतापर्यंत घेतली लस
१,५३९ ज्येष्ठांचे लसीकरण, ३७५ आजारीचे लसीकरण