ज्येष्ठ नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा
By admin | Published: July 23, 2016 02:01 AM2016-07-23T02:01:37+5:302016-07-23T02:01:37+5:30
ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना शासकीय कार्यालयांमार्फत राबविल्या जात आहेत.
ध. ज. पाटील यांचे आवाहन : चामोर्शीत कायदेविषयक शिबिर
चामोर्शी : ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना शासकीय कार्यालयांमार्फत राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश ध. ज. पाटील यांनी शुक्रवारी केले.
तालुका विधीसेवा समिती चामोर्शीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार व शासकीय योजना या विषयावर पंचायत समिती सभागृहात कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानाहून न्यायाधीश ध. ज. पाटील बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी, नायब तहसीलदार देवेंद्र दहीकर, अॅड. डी. व्ही. दोनाडकर, तालुका वकील संघाचे सचिव अॅड. के. टी. सातपुते, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आर. डी. राऊत, अॅड. अनंत उंदीरवाडे, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे गडचिरोलीचे अध्यक्ष डी. एन. बर्लावार, अॅड. चिळंगे, अॅड. डिम्पल उंदीरवाडे उपस्थित होत्या.
शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर सहायक शासकीय अभियोक्ता अॅड. दोनाडकर, अॅड. सातपुते तर ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या शासकीय योजना या विषयावर नायब तहसीलदार दहीकर, आर. डी. राऊत, डी. एन. बर्लावार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अॅड. एम. डी. सहारे, प्रास्ताविक अॅड. अनंत उंदीरवाडे तर आभार महेंद्र खुणेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी न्याय शाखेचे करंबे, जांभुळकर, कोसारे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)