बनावट पत्राने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

By admin | Published: July 27, 2014 12:06 AM2014-07-27T00:06:49+5:302014-07-27T00:06:49+5:30

प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक यांच्या कार्यालयाचा बनावट लेटर हेड बनवून सदर पत्र व्हॉटस्अ‍ॅपने राज्यातील संपूर्ण जिल्हा परिषदेच्या मुख्य

Sensation among the officials of the fake letter | बनावट पत्राने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

बनावट पत्राने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

Next

शिक्षण संचालक : व्हॉटस्अ‍ॅपवरून झाली धमाल
गडचिरोली : प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक यांच्या कार्यालयाचा बनावट लेटर हेड बनवून सदर पत्र व्हॉटस्अ‍ॅपने राज्यातील संपूर्ण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले. हा प्रकार माहित झाल्यानंतर अधिकारी व शिक्षकांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक महावीर माने यांची सही असलेला १९ जुलै २०१४ चे पत्र व्हॉटस्अ‍ॅपने सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. या पत्रामध्ये ३० सप्टेंबर २०१३ च्या पटसंख्येवर जिल्ह्यातील एकूण मंजूर पदसंख्ये एवढी पदे कार्यरत मुख्याध्यापकांमधून बिंदू नामावलीनुसार सेवाज्येष्ठतेच्या आधारे समुपदेशनाने समायोजित करावे आदी निर्देश देण्यात आले आहेत. यासंबंधीचे वृत्त प्रकाशित होताच अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली. वास्तविक १९ जुलै रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी असे कोणतेही पत्र पाठविले नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबद्दलची तक्रारही पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असल्याचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी स्पष्ट केले आहे. सदर बनावट पत्र तयार करणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Sensation among the officials of the fake letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.