निष्ठापूर्वक व समर्पणभावनेने प्रामाणिक सेवा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 01:09 AM2018-04-22T01:09:15+5:302018-04-22T01:09:15+5:30

लोकांचा शासन आणि प्रशासनावर असणारा विश्वास कायम राखण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणासह समर्पणपूर्वक आपले काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

Serve honestly and devoted service | निष्ठापूर्वक व समर्पणभावनेने प्रामाणिक सेवा द्या

निष्ठापूर्वक व समर्पणभावनेने प्रामाणिक सेवा द्या

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : नागरी सेवा दिन उत्साहात; उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकांचा शासन आणि प्रशासनावर असणारा विश्वास कायम राखण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणासह समर्पणपूर्वक आपले काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
१२ वा नागरी सेवा दिन शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शान्तनु गोयल होते. या कार्यक्रमास अपर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, वनसंरक्षक शिवाजी फुले, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, पोलिस उपअधीक्षक प्रदीप चौगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी उपस्थित होते.
वर्षभरात उत्तम कामगिरी करणाºया महसूल, पोलीस , वन विभाग तसेच जिल्हा परिषद कर्मचाºयांचा या कार्यक्रमात प्रमाणपत्राद्वारे सत्कार व गौरव करण्यात आला.
लोकांचा शासन यंत्रणेवर असणारा विश्वास कधीही कमी होऊ शकतो यामुळे प्रत्येकाने जाणीवपूर्वक सचोटीने आपले कार्य पार पाडले पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की नागरी सेवा देताना भामरागड सारख्या दुर्गम भागात जे अधिकारी व कर्मचारी उल्लेखनीय काम करित आहेत अशांची कामगिरी निश्चितपणे कौतुकास्पद आहे. पुढील वर्षापासून सुव्यवस्थित पध्दतीने सर्वांच्या कामाचा आढावा घेऊन अधिकाधिक जणांना पुरस्कारांमध्ये स्थान देण्याचा प्रयत्न प्रशासन करेल, असेही शेखर सिंह यावेळी म्हणाले.
राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विविध भागातून येथे येवून सेवा देणे म्हणजे नागरी सेवा होय असे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल म्हणाले. काम करताना संघ भावना ठेवल्याने कामगिरी चांगली होते. टिमवर्क म्हणून काम केले पाहिजे, असे गोयल म्हणाले. याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांची समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी केले.
नागरी सेवा पुरस्कारप्राप्त अधिकारी
नागरी सेवा पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांमध्ये महावितरणचे अधीक्षक अशोक मस्के, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, मुख्याधिकारी अर्शिया जुही, तहसीलदार कैलाश अंडील, तहसीलदार सतिश थेटे, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, अतुल जावळे, साबांविचे कार्यकारी अभियंता प्रकाश बूब, गट विकास अधिकारी शालिकराम पडघन, भामरागड पं.स. गट विकास अधिकारी किशोर गजलवार, तालुका आरोग्य अधिकारी मिलींद मेश्राम, गट शिक्षणाधिकारी अश्विनी सोणवने, अहेरीचे नायब तहसीलदार सी. टी. तेलंग, धानोराचे नायब तहसीलदार धनराज वाकुलकर, प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रदीप चौगावकर, पोलीस उपनिरिक्षक सम्राट वाघ, पोलीस उपनिरिक्षक बस्वराज माळी, नक्षल सेलचे अभिमान सरकार आदींचा समावेश आहे.

Web Title: Serve honestly and devoted service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.