आरोग्यासाठी विशिष्ट पद्धतीने सेवा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:53 PM2018-06-21T23:53:45+5:302018-06-21T23:53:45+5:30

आपल्या जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आणि जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी संवाद गडचिरोली हा उपक्रम आपण राबवित आहोत. आरोग्य हीच खरी श्रीमंती असल्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करून सेवा द्यावी लागेल.

Serve in a special way for health | आरोग्यासाठी विशिष्ट पद्धतीने सेवा द्या

आरोग्यासाठी विशिष्ट पद्धतीने सेवा द्या

Next
ठळक मुद्देपालक सचिव खारगे : आरोग्य, पोषण व स्वच्छतेवर विचारमंथन तथा प्रशिक्षण सत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली : आपल्या जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आणि जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी संवाद गडचिरोली हा उपक्रम आपण राबवित आहोत. आरोग्य हीच खरी श्रीमंती असल्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करून सेवा द्यावी लागेल. त्यामुळे उपस्थित आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी या संवाद सत्राचा पुरेपूर लाभ घ्यावा व अद्यावत माहिती तयार ठेवावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालक सचिव तथा वने व महसूल सचिव विकास खारगे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित आरोग्य आणि पोषण व वॉश या प्रथम चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी खारगे बोलत होते.
यावेळी आमदार डॉ.देवराव होळी, युनिसेफच्या अर्चना पाटील, रजनी नायर, निती आयोगाचे रामाकामा राजू, माजी प्रधान सचिव आरमुगम, जिल्हाधिकारी शेखर सिंह, भंडाराचे जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.जयस्वाल, सहाय्यक जिल्हाधिकारी सचिन ओंबासे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना पालक सचिव म्हणाले, दिल्ली येथे निती आयोगाने आयोजित केलेल्या सभेत ठरल्याप्रमाणे निर्देशांकात वाढ करण्यासाठी प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे अधिकारी कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी यांची कार्यशाळा घेऊन त्यामध्ये मते मतांतरे जाणून घेऊनच कामे करावी लागणार आहेत. त्यानुसारच इंडिकेटरचे मुल्यमापन करावयाचे आहे. गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी अधिक लक्ष घालून विशिष्ट पध्दतीने काम करण्याची गरज आहे. उच्च धोका असलेल्या मातांची विशेष काळजी घेऊन वेळोवेळी स्त्रिरोग तज्ज्ञांकडून तपासणी करणे सुध्दा आवश्यक आहे.
आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयातून एकत्रित काम करण्याची गरज आहे. लसीकरण नियमित व्हावे. लसीकरण करण्यासाठी अपेक्षित बालके आली नाहीत तर त्या बालकांचा शोध घेवून जिथे आहेत त्या ठिकाणी लसीकरण करु न घेण्याचाही प्रयत्न करायला पाहीजे. यासोबतच पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना पालक सचिवांनी दिल्या. कार्यशाळेत उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शनपर सूचना आमदार देवराव होळी, अर्चना पाटील, रजनी नायर यांनी दिल्या.
या कार्यशाळेनंतर आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गटनिहाय चर्चासत्र घेण्यात आले. त्यांना अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे रूपरेखा ठरविली.
योजनांचा १०० टक्के लाभ द्या
शासन आरोग्यासाठी विविध योजना राबवित आहे, या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना १०० टक्के व्हायला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत लाभार्थी वंचित राहू नये याकडे अधिकाºयांनी लक्ष द्यावे. प्रसुती घरी न करता दवाखान्यात करावी याकरीता गरोदर मातेचा आत्मविश्वास वृध्दींगत करण्यासाठी आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा वर्करपासून तर वैद्यकीय अधिकाºयापर्यंत सर्वानी प्रयत्न करावेत, असे निर्देश पालक सचिव विकास खारगे यांनी दिले.
जनधन शॉपमधून प्रॉडक्टस्चे मार्केटिंग
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असलेल्या मोहफुलातील पोषक तत्व पाहता त्यापासून निर्मित विविध पदार्थांची राज्याच्या विविध भागात उघडल्या जात असलेल्या जनधन शॉपमधून विक्री व मार्केटिंग केले जाईल, अशी माहिती पालक सचिव विकास खारगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Web Title: Serve in a special way for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य