पोलिसांचे ॲप देणार दुर्गम भागात सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 10:34 PM2022-10-15T22:34:39+5:302022-10-15T22:35:46+5:30

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली दुर्गम भागातील नागरिकांसाठी पोलीस दादालोरा खिडकीअंतर्गत काम करणाऱ्या युवक-युवती आणि पोलीस अंमलदारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा शनिवारी पोलीस मुख्यालयात पार पडली. या कार्यशाळेत १२० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. त्यांना ॲपबाबत माहिती देण्यात आली. या ॲपमुळे दुर्गम भागात नागरिकांना अनेक सुविधांचा लाभ घेणे अधिक साेपे हाेणार आहे. त्यासाठी इंटरनेटचे जाळेही वाढणार आहे.

Service in remote areas to provide police app | पोलिसांचे ॲप देणार दुर्गम भागात सेवा

पोलिसांचे ॲप देणार दुर्गम भागात सेवा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोलीस दलाच्या दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सुविधा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आता पोलिसांनी विशेष ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे आता दुर्गम-अतिदुर्गम भागांतील नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकीअंतर्गत बँक सेवा, जात प्रमाणपत्र, पीक विमा, पंतप्रधान विमा योजना, ई-श्रम कार्ड, पेन्शन सर्व्हिस, इन्शुरन्स यासारख्या सुविधा त्यांच्या दारातच उपलब्ध करू देणे सोईचे होणार आहे.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली दुर्गम भागातील नागरिकांसाठी पोलीस दादालोरा खिडकीअंतर्गत काम करणाऱ्या युवक-युवती आणि पोलीस अंमलदारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा शनिवारी पोलीस मुख्यालयात पार पडली. या कार्यशाळेत १२० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. त्यांना ॲपबाबत माहिती देण्यात आली. या ॲपमुळे दुर्गम भागात नागरिकांना अनेक सुविधांचा लाभ घेणे अधिक साेपे हाेणार आहे. त्यासाठी इंटरनेटचे जाळेही वाढणार आहे.
यावेळी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये उत्कृष्ट काम करणा­या युवक-युवतींचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला.
या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे, तसेच डिस्ट्रिक्ट मॅनेजर आकाश खोडवे, विशाल कुंभाळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, उपनिरीक्षक धनंजय पाटील व सर्व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.

२८६६ युवक-युवतींना मिळाला रोजगार
-    आतापर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ५१२ सुरक्षा रक्षक, ११४३ नर्सिंग असिस्टंट, ३१४ हॉस्पिटॅलिटी आणि इतर वेगवेगळ्या ट्रेडचे प्रशिक्षण देऊन २८६६ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 
-    तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापूर, गडचिरोली आणि बीओआय आरसेटी गडचिरोली यांच्यामार्फत ब्युटीपार्लर, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, बदक पालन, वराहपालन, शिवणकला, भाजीपाला लागवड, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अशा विविध प्रशिक्षणांतून ३५५४ युवक-युवतींना स्वयंरोजगाराचा मार्ग दाखविण्यात आला आहे.

 

Web Title: Service in remote areas to provide police app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस