उड्डाणपुलाअभावी ससेहोलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:30 AM2018-01-03T00:30:11+5:302018-01-03T00:30:25+5:30
स्थानिक रेल्वे मार्गाच्या स्टेशनवर जाळे वाढविल्याने प्लॅटफार्मची उंची वाढविण्यात आली. त्यामुळे पादचाºयांना सदर रेल्वे स्टेशन पार करणे प्रचंड अडचणीचे ठरत आहे. यावर उपाययोजना म्हणून रेल्वे विभागाने येथील तीनही प्लेटफार्मवर उडाणपुलाची व्यवस्था करण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : स्थानिक रेल्वे मार्गाच्या स्टेशनवर जाळे वाढविल्याने प्लॅटफार्मची उंची वाढविण्यात आली. त्यामुळे पादचाºयांना सदर रेल्वे स्टेशन पार करणे प्रचंड अडचणीचे ठरत आहे. यावर उपाययोजना म्हणून रेल्वे विभागाने येथील तीनही प्लेटफार्मवर उडाणपुलाची व्यवस्था करण्याची गरज आहे.
देसाईगंज हे शहर गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्टेशन असलेले एकमेव ठिकाण आहे. व्यापार उद्दिम व बाजारपेठे म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या येथील रेल्वे स्टेशनचा संपूर्ण कायापालट झालेला आहे. मात्र रेल्वेच्या अलिकडे व पलिकडे ये- जा करण्यासाठी प्रवाशी वा पादचाºयांना तीन उडाणपुलावरून अंदाजे तीनशे पायºया चढाव्या लागतात. तसेच उतराव्या लागतात.
ब्रिटिशांनी चांदा जिल्हा असताना या भागातील वनसंपदेचे महत्त्व ओळखून रेल्वे आणली. मागील शतकापर्यंत हिचे स्वरूप नॅरो गेज होते. मात्र काळानुरूप रेल्वेचे ब्राडगेजमध्ये रूपांतर झाले. आता संपूर्ण यंत्रणेसह प्लेटफार्म हे अत्याधुनिक झाले आहे. सदर स्टेशनवर रेल्वे मार्गाचे जाळे वाढल्याने प्लेटफार्मची उंची वाढविण्यात आली. त्यामुळे पादचाºयांना रेल्वे स्टेशन पार करणे आता अडचणीचे ठरत आहे. यावर उपाययोजना म्हणून रेल्वे विभागाने येथील तीनही प्लेटफार्मवर उडाणपुलाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
शाळा, महाविद्यालये, कार्यालये, बाजारात येण्यासाठी दोन उडाणपुलावरून मार्गक्रमण करावे लागते. आबालवृद्धांना त्रास होत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने नागरिकांसाठी सरळ एकच उडाणपूल तयार करून बाजार परिसराशी जोडण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.