दुष्काळ निवारण समित्या स्थापन करा
By admin | Published: July 18, 2016 02:16 AM2016-07-18T02:16:23+5:302016-07-18T02:16:23+5:30
जिल्ह्यात दरवर्षी ओला व कोरडा दुष्काळ पडतो. परंतु दुष्काळाचे मूल्यमापन झाल्यानंतर ज्यांचे नुकसान होते
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आमदारांची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यात दरवर्षी ओला व कोरडा दुष्काळ पडतो. परंतु दुष्काळाचे मूल्यमापन झाल्यानंतर ज्यांचे नुकसान होते त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. तर ज्यांचे नुकसान झाले नाही. त्यामुळे गाव स्तरावर दुष्काळ निवारण समित्या स्थापन कराव्या, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जुलै महिन्यात आठवडाभर मुसळधार पाऊस जिल्ह्यात झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांना दुबार पेरणी करावी लागली होती. परंतु या अतिवृष्टीने त्यांचे पऱ्हे वाहून गेले. घरांचीही पडझड झाली. सदर स्थिती गावातील लोकांना माहित आहे. गाव स्तरावर समित्या स्थापन केल्यास योग्य मूल्यमापन होऊन नुकसानग्रस्तांना लाभ मिळू शकतो. त्यामुळे गाव स्तरावर दुष्काळ निवारण समित्या स्थापन कराव्या, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी केली.