वैरागड येथे कोविड सेंटर उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:39 AM2021-04-28T04:39:23+5:302021-04-28T04:39:23+5:30
कोविड संसर्ग असल्यास बाधित रुग्णाला आरमोरी व गडचिरोली येथे विलगीकरणात राहावे लागते, या भीतीपोटी खोकला, सर्दी, तापाचे अनेक रुग्ण ...
कोविड संसर्ग असल्यास बाधित रुग्णाला आरमोरी व गडचिरोली येथे विलगीकरणात राहावे लागते, या भीतीपोटी खोकला, सर्दी, तापाचे अनेक रुग्ण हे सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करायला तयार नाहीत. वैरागड येथे कोविड सेंटर झाल्यास प्राथमिक लक्षण असणारे नागरिक स्वतः आपली कोरोना चाचणी करतील तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता अनेक गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वैरागड येथील धानोरा रांगी टी पॉईंट जवळील महसूल मंडळ कार्यालय काही प्राथमिक सुविधा उपलब्ध करून सेंटर सुरू करण्याची मागणी माजी आमदार मडावी यांनी केली आहे. वैरागड परिसरातील मोहझरी, सुकाळा, मानापूर, देलनवाडी, डोंगरतमासी, वडेगाव मेंढा, करपडा, लोहारा व परिसरातील गावात कोरोना रुग्ण आढळल्यास वैरागड येथील सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करून त्याँच्यावर उपचार होऊ शकतो. आरमोरी येथील सेंटरमधील रुग्णाची गर्दी टाळता येईल. त्यामुळे वैरागड येथे कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी माजी आ. मडावी यांनी केली आहे.