गोठ्याला लागलेल्या आगीत सात बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:41 AM2021-08-14T04:41:59+5:302021-08-14T04:41:59+5:30

ऐन खरीप हंगामात सातपुते या शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या घटनेत सुमारे पावणेदोन लाखांचे नुकसान झाले आहे. सातपुते ...

Seven goats died in a fire at a barn | गोठ्याला लागलेल्या आगीत सात बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

गोठ्याला लागलेल्या आगीत सात बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

Next

ऐन खरीप हंगामात सातपुते या शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या घटनेत सुमारे पावणेदोन लाखांचे नुकसान झाले आहे. सातपुते यांचे शेत गावालगतच असून त्याच ठिकाणी त्यांचे राहते घर व बाजूलाच जनावरांचा गोठा आहे. पावसाच्या दिवसात गोठ्यासभोवताल किडे व डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सातपुते यांनी आगीचे धुपाटणे केले होते. तेवढ्यातच रिमझिम पाऊस सुरू झाल्याने सातपुते यांनी लगबगीने बकऱ्या व बैल गोठ्यात बांधले आणि ते घराकडे गेले. जेवण करून सर्व गावकरी झोपेत असतानाच रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान गोठ्याला आग लागली.

शेतकऱ्याच्या तक्रारीवरून दोठकुलीच्या सरपंच जया सातपुते यांनी पंचनामा केला. यावेळी साक्षीदार म्हणून पं.स.चे पशुधन विकास अधिकारी डॉ.सागर डुकरे तसेच श्रीरंग बालाजी बोदलकर, केशव सखाराम सातपुते, मनोहर सखाराम सातपुते हे उपस्थित होते. ऐन शेतीच्या हंगामात प्रकाश सातपुते यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आता हंगाम कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. शासनाने या शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सरपंच व गावांतील नागरिकांनी केली आहे.

(बॉक्स)

मध्यरात्री संपूर्ण गाव धावले मदतीला

- भडकलेल्या आगीच्या ज्वाला पाहून संपूर्ण गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी गोठ्याकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यात सात बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. गोठ्यातील कृषी अवजारे, किरकोळ असलेले शेतीचे साहित्यसुध्दा या आगीत भस्मसात झाले.

- आग विझवण्यासाठी गावातील नागरिक व स्वतः सातपुते यांनी शर्थीचे प्रयत्न केले. आग विझवण्यासाठी गेलेले प्रकाश सातपुते यांना आगीचे चटके बसून तेसुध्दा गंभीर जखमी झाले. सकाळी सहायक पशुधन विकास अधिकारी डी.जी.देवारे यांनी गावात येऊन जखमी असलेल्या जनावरांवर तात्पुरता इलाज केला.

130821\img-20210813-wa0081.jpg

आगीत भस्मसात झालेल्या बकऱ्या

Web Title: Seven goats died in a fire at a barn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.