सातबारा परिवर्तनास गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:53 PM2018-08-02T23:53:49+5:302018-08-02T23:56:11+5:30

वर्ग-२ मधील जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करण्याच्या प्रक्रियेला मुलचेरा तालुक्यात गती प्राप्त झाली असून वर्षभरात ४५१ शेतकऱ्यांचा सातबारा वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये परावर्तीत झाला आहेत.

Seven Wave Transformation Speed | सातबारा परिवर्तनास गती

सातबारा परिवर्तनास गती

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासन पोहोचले नागरिकांच्या दारी : मुलचेरा तालुका प्रशासनाचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : वर्ग-२ मधील जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करण्याच्या प्रक्रियेला मुलचेरा तालुक्यात गती प्राप्त झाली असून वर्षभरात ४५१ शेतकऱ्यांचा सातबारा वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये परावर्तीत झाला आहेत.
तालुक्यातील सर्व सातबारांचे संगणकीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. संजय गांधी शाखेअंतर्गत निराधार योजना, श्रावणबाळ योजनेअंतर्गत ४ हजार १०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेअंतर्गत २६ लाभार्थी व आम आदमी विमा योजनेअंतर्गत ३६ प्रकरणे मंजूर झाली आहेत. ४ हजार ५१३ नागरिकांना उत्पन्न, जात, अधिवास प्रमाणपत्र वितरित केले आहे. वनहक्क वाटप उपक्रमाअंतर्गत देवदा येथील ५९ लाभार्थ्यांना वनहक्क पट्ट्यांचे वाटप केले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील १ हजार ८०९ नागरिकांना वैयक्तिक पट्टे व ८६ लाभार्थ्यांना सामूदायिक पट्टे वितरित केले आहेत. ४०.७९ हेक्टर आर झुडूपी जंगल निर्वानीचे प्रस्ताव सादर केले आहेत. १२ गावांना पेसा गावांचा दर्जा देण्याबाबत प्रस्ताव सादर झाले आहेत. गारपीठग्रस्त ७० मका शेतकºयांना १ लाख ९१ हजार रूपयांच्या मदतीचे वाटप झाले आहे. ३८३ धान उत्पादक शेतकºयांना २२ लाख ८४ हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. त्यापैकी १६ लाख रूपयांच्या मदतीचे वाटप झाले आहे.
निवडणूक शाखेच्या वतीने यावर्षी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा केली. ५१५ नवीन मतदार झाले आहेत. ३१७ मतदारांचा मृत्यू झाल्याने त्यांची नावे कमी केली आहेत. तर २७० मतदार स्थलांतरित झाले आहेत. तर १२४ मतदारांची नावे दोनदा झाली असल्याचे आढळून आले. सदर बदलही करण्यात आला. धन्नूर गावातील आपातग्रस्तांना १६ लाख रूपयांची मदत दिली आहे. जखमी व्यक्तींना ३८ हजार ५०० मृत जनावरांच्या मालकांना ५४ हजार रूपयांची मदत वितरित केली आहे. अंत्योदय योजनेअंतर्गत ४ हजार ५१५ कुटुंब, अन्न सुरक्षा अंतर्गत १७ हजार ७९ लाभार्थ्यांना राशनचा लाभ दिला जात आहे. हे सर्व उपक्रम मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांच्या मार्गदर्शनात केले जातात.
चार हजार कुटुंबांना रोहयोची कामे
चालू आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत ४ हजार ३७ कुटुंबातील ८ हजार ८१६ नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. एकूण २ लाख ६७ हजार २७० मनुष्य दिवस रोजगाराची निर्मिती झाली आहे. ५ कोटी ८५ लाख रूपयांची मजुरी अदा केली आहे. रोजगार हमी योजनेच्या मजुरांना त्याच हप्त्यात मजुरी उपलब्ध होईल, यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यामुळे मजुरी थकीत राहण्याचे प्रमाण मुलचेरा तालुक्यात अतिशय कमी आहे. रोजगाराची मागणी होताच रोजगार उपलब्ध करून दिला जातो, अशी माहिती मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांनी दिली.

Web Title: Seven Wave Transformation Speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती