पावणेतीन लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:00 AM2019-11-14T06:00:00+5:302019-11-14T06:00:33+5:30
वाहनाची तपासणी केली असता, वाहनात विदेशी दारूच्या २४० बॉटल आढळल्या. त्याची किंमत ६० रुपये होते. तसेच देशी दारूच्या ३ हजार ७०० सिलबंद बॉटल आढळल्या. त्याची किंमत १ लाख ८५ हजार रुपये होते. वाहनाची किंमत ६ लाख रुपये आहे. असा एकूण ८ लाख ४५ हजार रुपयांचा माल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज पोलिसांनी शिवराजपूर फाट्याजवळ सापळा रचून सुमारे पावणेतीन लाखांची दारू व सहा लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ८ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
चारचाकी वाहनाने दारू आणली जात असल्याची गोपनिय माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार देसाईगंज पोलिसांनी शिवराजपूर फाट्याजवळ सापळा रचला. वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकाने वाहन थांबविले. त्याला नाव विचारले असता, त्याने प्रमोद राजहंस हिरडकर (२९) रा. आजगाव ता. पवणी जि. भंडारा असे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात विदेशी दारूच्या २४० बॉटल आढळल्या. त्याची किंमत ६० रुपये होते. तसेच देशी दारूच्या ३ हजार ७०० सिलबंद बॉटल आढळल्या. त्याची किंमत १ लाख ८५ हजार रुपये होते. वाहनाची किंमत ६ लाख रुपये आहे. असा एकूण ८ लाख ४५ हजार रुपयांचा माल जप्त केला. वाहन विनाक्रमांकाचे असल्याचे दिसून आले. वाहन चालक प्रमोद हिरडकर याच्या विरोधात देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलीस निरिक्षक प्रदीप लांडे, सहायक पोलीस निरिक्षक रूपाली बावणकर, पीएसआय गुरूकर, हर्षल नगरकर, मोहनदास सयाम, अमोल पोटवार, राकेश देवेवार यांनी केली.
धर्मपुरातील महिलांनी दोन दारू विक्रेत्यांना केले पोलिसांच्या स्वाधीन
आष्टी : परिसरातील धर्मपुरी येथील महिला व ग्रामस्थांनी दोन दारू विक्रेत्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तसेच १४ दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, असे निवेदन आष्टी पोलिसांना दिले आहे. धर्मपूर येथील प्रकाश शेडमाके हा मोहफुलाची दारू काढून विक्री करीत होता. महिलांनी त्याच्या घरी धाड टाकून १० लिटर दारू जप्त केली. त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच बायजाबाई सिडाम हिच्या घरूनही दारू व मोहफुलाचा सडवा जप्त केला. सदर कारवाई तंटामुक्त समिती अध्यक्ष निलकंठ दुधकोहर, उपाध्यक्ष प्रियादेवी आत्राम, अश्विनी ठाकूर, ममता गावडे, अरूणा मंगाम, सारीका वेलादी, शामला तोरे, ललिता कोडाप यांच्या पुढाकाराने करण्यात आली.