सावंगीत भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:25 AM2018-05-25T01:25:05+5:302018-05-25T01:25:05+5:30

तालुक्यातील सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. सध्या येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

Severe water shortage | सावंगीत भीषण पाणीटंचाई

सावंगीत भीषण पाणीटंचाई

Next
ठळक मुद्देनळयोजना कुचकामी : प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागते टँकरद्वारे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : तालुक्यातील सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. सध्या येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
देसाईगंज तालुक्यातील सावंगी या गावात ग्राम पंचायतची नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु जलपातळी खालावल्याने पाणी टंचाईचीही समस्या निर्माण झाली आहे. शिवाय गावाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे जुनीच नळ योजना गावात पाणीपुरवठा करण्यास सक्षम नाही. येथे वाढत्या लोकसंख्येनुसार वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करणे गरजेचे आहे. परंतु नवीन प्रस्तावित नळयोजनेचा प्रस्ताव धूळखात असल्याचे दिसून येते. गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने सदर आरोग्य केंद्राला नळ योजनेचा लाभ देणे शक्य नाही. यातून मार्ग काढण्यासाठी आरोग्य केंद्रात दोन बोरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सध्यास्थितीत जलपातळी खालावल्याने बोरही कुचकामी ठरत आहे. येथील आरोग्य केंद्रात वास्तव्यास असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
आरोग्य केंद्रातील पाण्याची ही भीषण समस्या लक्षात घेता यावर मात करण्यासाठी सरपंच राजू बुल्ले यांच्या पुढाकाराने सध्या टॅकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने गावातील नागारिकांसह आरोग्य केंद्रातील रूग्णांना जबर फटका बसत आहे. त्यामुळे सावंगी येथे प्रस्तावित नळ योजना तत्काळ कार्यान्वित करावी, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
बाहेर जिल्ह्यातील रूग्ण होतात दाखल
देसाईगंज तालुक्यातील महत्त्वपूर्ण आरोग्य केंद्र म्हणून सावंगीची ओळख आहे. या केंद्रांतर्गत सावंगी, गांधीनगर, आमगाव, नवीन लाडज, विसोरा, एकलपूर आदी सहा गावे समाविष्ट असून लगतच्या सोनी, चप्राड, इंदोरा आदी गावातील गरोदर माता येथीलच आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येतात. प्रसंगी बाळंतपणासाठी गरोदर मातांना आरोग्य केंद्रात भरती राहावे लागत असल्याने भीषण पाणीटंचाईचा येथील रुग्णांनाही जबर फटका बसू लागला आहे.

Web Title: Severe water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.