लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण; शिक्षकाला सात वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:25 AM2021-07-01T04:25:28+5:302021-07-01T04:25:28+5:30
बाेरे हे पत्नीसह सिराेंचा येथील स्वत:च्या घरी वास्तव्यास राहात हाेते. फिर्यादी युवती ही माेयाबीनपेठा येथील रहिवासी असून, ती सिराेंचा ...
बाेरे हे पत्नीसह सिराेंचा येथील स्वत:च्या घरी वास्तव्यास राहात हाेते. फिर्यादी युवती ही माेयाबीनपेठा येथील रहिवासी असून, ती सिराेंचा येथे शिक्षण घेत हाेती. बाेरे याने पहिली पत्नी असतानासुद्धा दुसरे लग्न करण्याचे आमिष देऊन त्या युवतीसोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, २० जुलै २०१५ राेजी ती युवती आरोपी बोरे याच्या घरी राहण्यासाठी आली. आराेपीच्या पत्नीने त्या युवतीला सिराेंच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता ती युवती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शिताफीने तिचा गर्भपात करण्यात आला. पाेलिसांनी तपास पूर्ण करून गडचिराेलीच्या न्यायालयात आरोपीविरुद्ध दाेषाराेपपत्र दाखल केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी साक्ष पुरावे तपासून व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आराेपी बालाजी इसा बाेरे याला भादंविचे कलम ३७६ अन्वये सात वर्षांचा सश्रम कारावास व एकूण ३३ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियाेक्ता एस.यू. कुंभारे यांनी काम पाहिले.
(बॉक्स)
जेवणातून दिले गर्भपाताचे औषध
युवती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २९ जुलै २०१५ राेजी रात्री अर्भक नष्ट करण्याच्या उद्देशाने आराेपी बालाजी बाेरे याने त्या युवतीला जेवणामध्ये गर्भपाताचे मिसळवून औषध दिले. त्याच दिवशी रात्री तिच्या पाेटातील तीन महिन्याच्या अर्भकाचा गर्भपात झाला. दरम्यान, आराेपीने या युवतीला घराबाहेर निघू दिले नाही. ही बाब त्या युवतीने आपल्या आईवडिलांना फोनवरून कळविली. आईवडिलांनी ३० जुलैला सिराेंचा पाेलीस ठाण्यात आराेपीविराेधात तक्रार दाखल केली.