अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:28 AM2021-06-04T04:28:10+5:302021-06-04T04:28:10+5:30
प्राप्त माहितीनुसार, यातील पीडित मुलगी अवघी १५ वर्षांची आहे. ती आपल्या गावावरून आरमोरीच्या शाळेत ये-जा करताना आरोपी युवक तिचा ...
प्राप्त माहितीनुसार, यातील पीडित मुलगी अवघी १५ वर्षांची आहे. ती आपल्या गावावरून आरमोरीच्या शाळेत ये-जा करताना आरोपी युवक तिचा पाठलाग करत होता. यादरम्यान सदर युवक तिच्या गावातही पोहोचला. तिला अनेक वेळा शौचास जाण्याच्या बहाण्याने बाहेर बोलवून वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याशी बळजबरी केली. कोणाला सांगू नको, अशी धमकीही तिला दिली होती.
याबाबत पीडित युवतीच्या आईने २ जून रोजी आरमोरी ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३५४, ३५४(अ)(१), ३५४ (ड)(१), ४४८, ३७६ (३), ३७६ (२)(एन), ५०६, तसेच सहकलम लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद केला. पुढील तपास पो. उपनिरीक्षक कांचन उइके करीत आहेत. आरोपीस अटक करण्यात आली असून, ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.