प्राणहिता नदीतून सागवान तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 01:02 AM2019-03-24T01:02:42+5:302019-03-24T01:03:04+5:30
अहेरी वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बोरी बिटमधील प्राणहिता नदीच्या पात्रातून जवळपास दोन लाख रुपये किमतीची सागवान लाकडे जप्त करण्यात आली. सदर कारवाई शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : अहेरी वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बोरी बिटमधील प्राणहिता नदीच्या पात्रातून जवळपास दोन लाख रुपये किमतीची सागवान लाकडे जप्त करण्यात आली. सदर कारवाई शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
प्राणहिता नदी पात्रातून लाकडाची तस्करी होत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांनी या भागात सातत्याने लक्ष पुरविले होते. खबऱ्यांचे जाळे तयार करून अद्यावत माहिती प्राप्त करीत होते. २३ मार्च रोजी त्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये नदी पात्रातून तेलंगणा राज्यात नेण्याच्या उद्देशाने पाण्यात बांधून ठेवलेली सागवानी लाकडे तसेच नदी काठावर असलेली लाकडे जप्त करण्यात आली.
सदर कारवाई आलापल्लीचे क्षेत्र सहायक योगेश शेरेकर रामाराव देवकते, आलापल्ली परिक्षेत्राचे वनरक्षक धनयंज कुमरे, काशिनाथ टेकाम, नानाजी सोयाम यांनी केली. विशेष म्हणजे बोरी बिटमध्ये यापूर्वी मोठ्या प्रमाणात लाकूड तस्करी झाली होती. या प्रकरणी एका कर्मचाऱ्याला निलंबित सुध्दा करण्यात आले होते. त्यानंतर या परिसरात वनकर्मचाऱ्यांची विशेष पाळत ठेवली आहे.