शोकविलापाने गहिवरला परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:46 AM2017-11-26T00:46:30+5:302017-11-26T00:47:01+5:30

शहीद पोलीस हवालदार सुरेश गावडे यांचे पार्थिव घेऊन दुपारी १.४० च्या सुमारास हेलिकॉप्टर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उतरले. संपूर्ण पोलीस दलाचे जवान एका बाजुने....

The Shamelessly Ghaivala Campus | शोकविलापाने गहिवरला परिसर

शोकविलापाने गहिवरला परिसर

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय इतमामात अंत्यसंस्कार : पंचक्रोशीतील नागरिकांनी मूळ गावी वाहिली श्रद्धांजली

ऑनलाईन लोकमत 
गडचिरोली/वैरागड : शहीद पोलीस हवालदार सुरेश गावडे यांचे पार्थिव घेऊन दुपारी १.४० च्या सुमारास हेलिकॉप्टर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उतरले. संपूर्ण पोलीस दलाचे जवान एका बाजुने, दुसºया बाजूने पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तथा लोकप्रतिनिधी ओळीने उभे होते. सशस्त्र महिला पोलीस पथक आणि पोलीस बँड पथक सलामी देण्यासाठी सज्ज होते. त्या धीरगंभीर वातावरणात शहीद गावडेंचे पार्थिव मैदानातील शामियान्यात आणण्यात आले. पूर्णपणे शांत असलेल्या त्या वातावरणात एकच आवाज संपूर्ण मैदानभर गुंजत होता आणि तो होता गावडे यांच्या कुटुंबीयांच्या विलापाचा. त्यांचा तो विलाप पाहून सर्वच उपस्थितांची डोळे पाणावली होती.
शुक्रवारी आपले कर्तव्य बजावताना नक्षल्यांनी घडविलेल्या स्फोटात सुरेश गावडे यांना वीरमरण आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वरिष्ठ पोलीस व जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पार्थिवावर तिरंगा ओढल्यानंतर सर्व अधिकारी व पदाधिकाºयांनंी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर महिला पोलीस पथकाने हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी गावडे यांच्या पत्नी, दोन मुली आणि मुलासह परिवारातील इतर सदस्य, इतर पोलीस परिवारातील सदस्यांना मैदानाच्या एका बाजुला शामियान्यात बसविण्यात आले होते. श्रद्धांजली वाहिल्यानंतर सर्व अधिकारी-पदाधिकारी गावडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी तिकडे गेले. यावेळी अतिरिक्त पो.महासंचालक कनकरत्नम, आ.कृष्णा गजबे यांनी गावडे यांच्या मुलाचे शिक्षण विचारून त्याला पोलीस दलात नोकरी देण्याची हमी दिली.
गावकºयांची मने जिंकली
आरमोरी तालुक्याच्या अगदी टोकावर असलेल्या कोसमटोला येथील सुरेश गावडे हे २२ वर्षांपूर्वी पोलीस दलात भरती झाले. १२ वर्षे त्यांनी सी-६० मध्ये काम केले होते. नक्षल चकमकीत यापूर्वी ते दोनदा जखमी सुध्दा झाले होते. अत्यंत गरीब परिस्थितीत हालअपेष्टा सहन करीत शिक्षण घेतले. सुरेश यांनी पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण भाकरोंडी येथील आश्रमशाळेत घेतले. अकरावी, बारावीचे शिक्षण विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मानापूर येथे घेतले. मनमिळाऊ स्वभावाच्या सुरेश यांनी गावकºयांची मने जिंकली होती. नोकरीनिमित्त वर्षभर बाहेर राहात असूनही ते दिवाळीच्या सणासाठी हमखास गावाकडे येत असे. आता ते कधीही येणार नाही, या जाणिवेने त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक गहिवरले होते. सुरेशच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा तसेच तीन भाऊ असा परिवार आहे.
मुलीच्या प्रश्नाने सर्वच झाले नि:शब्द....
सांत्वन सुरू असताना गावडे कुटुंबीयांचा विलाप सुरूच होता. यावेळी गावडे यांच्या मुलीने पोलीस दलातील नोकरी करताना आपले वडील किती कर्तव्यकठोर होते, याचे स्मरण करवून दिले. एका प्रसंगाचा संदर्भ देत तिने मुलीच्या आॅपरेशनसाठीही बाप येऊ शकत नाही का? असा उद्विग्न सवाल केला तेव्हा सर्वांनाच नि:शब्द व्हावे लागले.
अंत्यसंस्काराला उलटले पंचक्रोशीतील नागरिक
भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या सुरेश गावडे यांच्यावर त्यांचे मूळगाव असलेल्या आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी गट ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया कोसमटोला येथे शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला कोसमटोला पंचक्रोशीतील हजारोंचा शोकाकूल जनसमुदाय उपस्थित होता.
सुरेश गावडे हे शहीद झाल्याची बातमी कळताच त्यांचे नातेवाईक व गावामध्ये शोककळा पसरली होती. पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालयात मानवंदना दिल्यानंतर शनिवारी दुपारी त्यांचे पार्थिव आणले जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावातील नागरिक गावाच्या बाहेर येऊन सुरेश यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा करीत होते. गावासभोवतालचे नागरिक कोसमटोला येथे जमा झाल्याने कोसमटोला गावाला जत्रेचे स्वरूप आले होते. पार्थिव येताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सायंकाळी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

Web Title: The Shamelessly Ghaivala Campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.