आरक्षणाचा लढा तीव्र करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 10:17 PM2017-11-03T22:17:35+5:302017-11-03T22:17:47+5:30

महाराष्टÑातील धनगर व कुरमार जमातीस अनुसूचित जमातीत समाविष्ट करून आरक्षणाची अंंमलबजावणी करण्याची मागणी मागील ६७ वर्षांपासून प्रलंबित आहे.

Sharpen the reservation's fight | आरक्षणाचा लढा तीव्र करा

आरक्षणाचा लढा तीव्र करा

Next
ठळक मुद्देविकास महात्मे यांचे आवाहन : रामाळा येथे जनजागृती सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : महाराष्टÑातील धनगर व कुरमार जमातीस अनुसूचित जमातीत समाविष्ट करून आरक्षणाची अंंमलबजावणी करण्याची मागणी मागील ६७ वर्षांपासून प्रलंबित आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी धनगर व कुरमार समाजाने एकत्रित येऊन लढा तीव्र करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले.
चामोर्शी तालुक्यातील रामाळा येथे मंगळवारी जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या मेळाव्याला डॉ. तुषार मर्लावार, डॉ. मंगेश गुलवाडे, संदीप शेरकी, डॉ. नारायण कर्रेवार, संदीप शेरकी, मारोती कोरेवार, मारोती उमलावार, बिर सरगेवार आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम रामाळा गावातून शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजातील विविध पोटजातीबद्दलची माहिती सांगितली. कुरमार समाजात धनगर आरक्षणाविषयी काही गैरसमज निर्माण झाले आहेत. सदर गैरसमज त्यांनी दूर केले.
प्रास्ताविकादरम्यान डॉ. कर्रेवार यांनी कुरमार समाज बांधवांना मेंढ्या चारण्यासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात राखीव कुरण क्षेत्र उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यापूर्वी मेंढ्या जंगलामध्ये चारण्यासाठी नेल्या जात होत्या. आता मात्र जंगलात मेंढ्या चारण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मेंढी पालन व्यवसाय अडचणीत आला आहे. स्वतंत्र कुरण क्षेत्राची गरज निर्माण झाली आहे. इंदाळा येथे खासदार निधीतून समाजभवन बांधून देण्याची मागणी केली. संचालन आरेवार तर आभार लाचम्मा शिर्गेवार यांनी केले. यशस्वीतेसाठी मुखरू कोरेवार, संजय करेवार यांनी सहकार्य केले.
५ ला नागपुरात मेळावा
५ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्याचे आयोजन करण्यात आाले आहे. या मेळाव्याला धनगर, कुरमार समाजातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
 

Web Title: Sharpen the reservation's fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.