वाघाला जेरबंद न करताच शार्पशूटर माघारी परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2017 02:09 AM2017-05-31T02:09:36+5:302017-05-31T02:09:36+5:30

तालुक्यातील रवी, कोंढाळा, मुलूरचक, उसेगाव परिसरात ठाण मांडून आपली दहशत निर्माण केलेल्या वाघाला गुंगीचे इंजेक्शन देऊन

Sharpshooter returned without tearing the tiger | वाघाला जेरबंद न करताच शार्पशूटर माघारी परतले

वाघाला जेरबंद न करताच शार्पशूटर माघारी परतले

Next

दोन दिवसांची मुदत संपली : वाघ कॅमेऱ्यातच कैद झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील रवी, कोंढाळा, मुलूरचक, उसेगाव परिसरात ठाण मांडून आपली दहशत निर्माण केलेल्या वाघाला गुंगीचे इंजेक्शन देऊन पकडण्यासाठी ताडोबा येथून दोन पथके बोलविण्यात आली होती. त्यांनी संपूर्ण परिसर छाणून काढला. मात्र वाघाचा थांगपत्ता लागला नाही. शार्प शुटरच्या पथकांना दिलेली दोन दिवसांची मुदत संपल्याने शार्प शुटरचे पथक वाघाला न पकडताच परत गेले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये आणखी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोंढाळा व रवी येथील दोन इसमांचा बळी घेतल्यानंतर वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावले. आठ दिवस पिंजरे लावूनही वाघाला जेरबंद करता आले नाही. वनमंत्री व प्रधानसचिवांच्या निर्देशानंतर वाघाला गुंगीचे इंजेक्शन देण्यासाठी ताडोबा येथील १० जणांचा समावेश असलेली दोन पथके रवी परिसरात दाखल झाली. या पथकांना २७ व २८ मे या दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. पथकातील कर्मचाऱ्यांनी दोन दिवस जंगलात शोध अभियान राबविले आहे. मात्र वाघाने शार्प शुटरच्या पथकाला हुलकावणी दिली. दोन्ही दिवस पथकाला वाघ न गवसल्याने शार्प शुटरचे पथक मुदत संपल्याने २९ मे रोजी परत गेले.
शार्प शुटरला आणखी बोलविण्यासाठी वन विभागाच्या मार्फतीने वन विभागाच्या प्रधान सचिवांची परवानगी घ्यावी लागणार आहे. १५ दिवसांपासून वाघ हुलकावणी देत आहे. त्याचबरोबर शेतीच्या कामांना सुरूवात झाली आहे. अशा स्थितीत वाघाची दहशत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही परिस्थिती वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

उसेगाव तलावात मांडले बस्तान
२९ मे रोजी शार्प शुटरचे पथक सकाळी परत गेल्यानंतर याच दिवशी नरभक्षक वाघ उसेगाव कॅनलच्या बाजुला असलेल्या तलावात सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान अंदाजे दोन तास निवांतपणे बसून होता. मात्र याबाबतची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. मात्र शार्प शुटर नसल्याने अधिकारी काहीही करू शकले नाही.

Web Title: Sharpshooter returned without tearing the tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.