वसातील निवारा जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:37 AM2021-04-16T04:37:32+5:302021-04-16T04:37:32+5:30

गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्याचे छत ...

Shelter dilapidated | वसातील निवारा जीर्ण

वसातील निवारा जीर्ण

Next

गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्याचे छत वादळामुळे पूर्णत: उडाले आहे. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना धोका आहे.

कुत्र्यांचा बंदोबस्त करा.

एटापल्ली : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर पंचायतीची आहे. या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

उसेगाव मार्ग खड्ड्यात

गडचिरोली : तालुक्यातील उसेगाव ते भिकारमौशी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून आवागमन करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

मातीचे बंधारे बांधण्याची मागणी

आलापल्ली : वनविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर प्रस्ताव अजूनही धूळखात पडला आहे. मातीचे बंधारे निर्माण झाल्यास सिंचनाची सोय होईल.

अतिक्रमित जागेचा नमुना आठ द्या

वैरागड : वनहक्क कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना अतिक्रमित जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, सदर पट्टे मिळालेले शेकडो शेतकरी सातबारापासून वंचित आहेत. सातबारा मिळालेले शेतकरीसुद्धा नमुना आठपासून वंचित आहेत. पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत.

बायोगॅससाठी अनुदान वाढविण्याची गरज

गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास या कुटुंबांना बिनाखर्ची गॅसची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागात आजही बऱ्या प्रमाणात गोधन आहे. गोधनापासून मिळणाऱ्या शेणाचा उपयोग हाेऊ शकताे.

सायटोलाजवळ पूल बांधकामाची मागणी

कुरखेडा : तालुक्यातील अरततोंडी-सायला मार्गावरील सती नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अरततोंडी ते सती नदीघाट हे अंतर जवळपास दोन किमी आहे. या ठिकाणी पूल बांधणे अत्यंत आवश्यक झाले असल्याने पूल बांधकाम करण्याची मागणी आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे लावा

गडचिरोली : खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र, यासाठी अनुदानाची तजवीज शासनाने करून दिली नसल्याने अजूनपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील एकाही शाळेने सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाहीत. त्यामुळे धाेका आहे.

डुकरांचा हैदाेस वाढला

देसाईंज : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वाॅर्डांत डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे दुर्लक्ष आहे.

मध संकलनाच्या प्रशिक्षणाची मागणी

धानोरा : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे. यासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज आहे.

केरोसिनअभावी अडचण

अहेरी : ज्या नागरिकांकडे सिलिंडर उपलब्ध आहे, अशा नागरिकांना केरोसिनचा पुरवठा करणे शासनाने बंद केले आहे. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. केरोसिन मिळत नसल्याने अडचण वाढली आहे. ग्रामीण भागात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो.

राजोलीचा पूल अर्धवट

धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापावे लागते.

देलाेडा-सूर्यडाेंगरी मार्ग उखडला

आरमाेरी : देलाेडा-सूर्यडाेंगरी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मुरमाडी परिसर समस्याग्रस्त

गडचिरोली : तालुक्यातील मुरमाडी परिसरात आठ ते दहा गावांचा समावेश आहे. या भागात कच्चे रस्ते तसेच सिंचनाच्या साेयी-सुविधांचा अभाव असल्याने अनेक वर्षांपासून शेतकरी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या भागाचा विकास साधावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

Web Title: Shelter dilapidated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.