बोकड चोरून नेणाऱ्यांना करपडा येथील गावकºयांनी दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:59 PM2018-09-17T22:59:56+5:302018-09-17T23:00:17+5:30

गोठ्यात बांधलेला बोकड चोरणाऱ्या तिघा जणांना पकडून करपडा येथील नागरिकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर घटना सोमवार रात्रीच्या सुमारास घडली.

The shepherds of Karpada gave a tip to the thief | बोकड चोरून नेणाऱ्यांना करपडा येथील गावकºयांनी दिला चोप

बोकड चोरून नेणाऱ्यांना करपडा येथील गावकºयांनी दिला चोप

Next
ठळक मुद्देपोलिसांच्या केले स्वाधीन : खांद्यावर ठेवून केली जात होती चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : गोठ्यात बांधलेला बोकड चोरणाऱ्या तिघा जणांना पकडून करपडा येथील नागरिकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर घटना सोमवार रात्रीच्या सुमारास घडली.
छोटू अरूण बोदेले (२४), हरिदास ऋषी धनकर (२७), केशव गोविंदा कोडप (३६) तिघेही रा. वैरागड असे बोकड चोरणाऱ्या चोरट्यांची नावे आहेत. हे तिघेही एमएच ३३ यू ७८५९ व एमएच ३६ टी ८७८२ या क्रमांकाच्या दुचाकीने करपडा येथे रात्री १२ वाजता सुमारास पोहोचले. दुचाकी गावाबाहेर ठेवून धनराज डोंगरवार यांच्या गोठ्यात बांधलेला बोकड खांद्यावर घेऊन चोरून नेत होते. दरम्यान वीज पंप सुरू करून गावातील शेतकरी महादेव चुधरी व सुनील ताडाम हे घराकडे परत येत होते. बोकड चोरून नेत असल्याचे लक्षात येताच दोघांनीही आरडाओरड केली. बोकड टाकून चोरट्यांनी पळ काढला. मात्र गावकऱ्यांनी तिघांनाही पकडले. याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलीस येईपर्यंत गावकऱ्यांनी तिघांनाही चांगलाच धडा शिकविला. दुचाकी ओळखली जाऊ नये, यासाठी दोन्ही दुचाकीच्या नंबर प्लेटवर चोरट्यांनी शेण लावून ठेवला होता. त्याचबरोबर करपडा येथे जाण्यापूर्वी या चोरट्यांनी एक बोकड चोरून तो आरकबोडी येथे बांधून ठेवला होता.
आठ दिवसांपूर्वी वैरागड येथे चोरी झाली. त्याचबरोबर वैरागड व परिसरातील गावांमध्ये बॅटºया, विद्युतपंप, वायर चोरी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या दृष्टीने पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक अजित राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार भिमराव बारसागडे, सुमीत बरडे करीत आहेत.

Web Title: The shepherds of Karpada gave a tip to the thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.