आंबेशिवणी ग्रा.पं.वर शिवसेनेचे वर्चस्व तर नवरगाव ग्रा.पं.मध्ये अविराेध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:37 AM2021-02-16T04:37:29+5:302021-02-16T04:37:29+5:30
१५ फेब्रुवारीला पार पडलेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेना समर्थित गटाने बाजी मारली. सरपंचपदी सरिता टेंभुर्णे तर उपसरपंचपदी ...
१५ फेब्रुवारीला पार पडलेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेना समर्थित गटाने बाजी मारली. सरपंचपदी सरिता टेंभुर्णे तर उपसरपंचपदी याेगाजी कुडवे यांची निवड झाली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, तालुका प्रमुख गजानन नैताम, अमोल मेश्राम, संजय बोबाटे, स्वप्निल खांडरे, निकेश लोहंबरे, राहुल सोरते तसेच नवनिर्वाचित सदस्य विट्ठल बोरुले, विलास झंझाळ, प्रणाली पेंदाम उपस्थित होते.
नवरगावात सरपंच व उपसरपंच अविरोध
गडचिरोली तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक १५ फेब्रुवारी रोजी पार पडली. यात सरपंच व उपसरपंच पदाची अविरोध निवड करण्यात आली. ७ सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी सुनीता दादाजी दशमुखे व उपसरपंचपदी आशा भास्कर भोयर यांची वर्णी लागली. ग्राम विकास आघाडी समर्पित नवनियुक्त सदस्य कृष्णा जांभूळकर, उमाकांत चुदरी, राजेंद्र थोरात, कविता भैसारे यांनी त्यांना सहकार्य केले. पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे यांच्या नेतृत्वात सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे अविरोध आणण्यात यश आले. निवडीबद्दल उपसभापती विलास दशमुखे, केशवराव दशमुखे, गणपत चुदरी, फागोजी भोयर, धनुर्धन भैसारे, रेवनाथ चुदरी, दादाजी दशमुखे, जयदेव सेलोटे, संजय उंदीरवाडे, पत्रूजी धाकडे, भास्कर भोयर आदींनी आनंद व्यक्त केला.