कोरची व देसाईगंजचे शिवसेना पदाधिकारी भाजपाच्या तंबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:47 PM2017-09-20T23:47:44+5:302017-09-20T23:47:57+5:30

स्थानिक राजीव भवनात मंगळवारी झालेल्या भाजपच्या कार्यक्रमात कोरचीचे नगर पंचायत अध्यक्ष नसरूद्धीन भामानी यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे कोरची तालुक्यातून शिवसेनेचा सफाया झाला आहे.

 Shiv Sena office bearers of Korchi and Desai Ganj in BJP's tent | कोरची व देसाईगंजचे शिवसेना पदाधिकारी भाजपाच्या तंबूत

कोरची व देसाईगंजचे शिवसेना पदाधिकारी भाजपाच्या तंबूत

googlenewsNext
ठळक मुद्देआमदार, खासदारांची उपस्थिती : नगर पंचायत अध्यक्षासह अनेक नगरसेवक व सरपंचांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची/देसाईगंज : स्थानिक राजीव भवनात मंगळवारी झालेल्या भाजपच्या कार्यक्रमात कोरचीचे नगर पंचायत अध्यक्ष नसरूद्धीन भामानी यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे कोरची तालुक्यातून शिवसेनेचा सफाया झाला आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय विस्तार योजनेअंतर्गत भाजपतर्फे देशभर पक्ष विस्तार उपक्रम राबविला जात आहे. याच योजनेअंतर्गत कोरची येथे मंगळवारी कार्यक्रम पार पडला. मात्र यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी राडा घातल्याने कार्यक्रम प्रभावित झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते होते. यावेळी मंचावर आ. कृष्णा गजबे, भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, किसन नागदेवे, प्रकाश पोरेड्डीवार, जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे, मोती कुकरेजा, कोरची तालुका प्रभारी विलास गावंडे, रमाकांत ठेंगरी, रवींद्र ओल्लालवार, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, राजू जेठानी, श्याम उईके, विरेंद्र अंजनकर, गोपाल उईके, नंदू पेट्टेवार, खेमराज डोंगरवार, चांगदेव फाये, अ‍ॅड. उमेश वालदे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना तालुकाध्यक्ष तथा नगराध्यक्ष नसरूद्धीन भामानी, माजी जि. प. सदस्य पद्माकर मानकर यांच्यासह कोरचीचे सहा नगरसेवक, चार सरपंच व दोन उपसरपंच तसेच इतर शिवसेना कार्यकर्त्यांचा समावेश आहे. देसाईगंजचे शिवसेना शहर अध्यक्ष, वानखेडे यांनीसुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.
याप्रसंगी नसरूद्धीन भामानी यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपला फायदा होईल, असे प्रकाश पोरेड्डीवार यांनी सांगितले. यावेळी किसन नागदेवे यांनी मार्गदर्शन केले. आ. कृष्णा गजबे म्हणाले, ‘एक बुथ २५ युथ’ ही संकल्पना डोळ्यासमोरी ठेवून पक्ष विस्तार करण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या प्रत्येक योजना तळागळातील लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोेचवावेत, राजीव भवनाचा विकास करू, कोरची-बेतकाठीचा रस्ता तयार झाला असून बोटेकसा व कोटगूल या मार्गाच्या कामाचे टेंडर निघाले आहेत. लवकरच या तालुक्यात पक्के रस्ते होतील, असे सांगितले. कोरची नगर पंचायतीला विकासासाठी दोन कोटी रूपयांचा निधी दिल्याचे आ. गजबे यांनी यावेळी सांगितले. नव्याने भाजपात प्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांच्या कर्तव्यानुसार पद दिले जाईल, असे खा. अशोक नेते यांनी सांगितले.
देसाईगंजमध्ये सेनेला खिंडार
देसाईगंज तालुक्यात अलिकडे झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला सपाटून हार सहन करावी लागली. त्यातून सावरण्याच्या आत आता सेनेचे शहर प्रमुख सचिन वानखेडे यांनी आपल्या प्रमुख समर्थकांसह भाजपात प्रवेश केल्याने सेनेला मोठा धक्का बसला आहे.
कोरची येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यात शहर प्रमुख सचिन वानखेडेसह जगन्नाथ फडणवीस, कैलास वानखेडे, गोवर्धन नंदापुरे, कृष्णा मेश्राम, रामचंद्र मोहुलें, विपुल ढोरे, अक्षय साखरकर, दिगंबर मेश्राम, दुधराम हषें, खुशाल दोनाडकर, गजानन मारबते, गजानन सहारे, राजकुमार बागडे, धनराज चंदनखेडे, मोहन कनोजिया, वासुदेव मेश्राम, शामराव मारबते आदी प्रमुख कार्यकत्यांचा समावेश आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात राडा
कार्यक्रम सुरू असताना आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी शेकडो विद्यार्थ्यांसह कार्यक्रमस्थळी पोहोचले. १२ सप्टेंबर रोजी कोरची शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस जबाबदार असणाºया मुख्याध्यापक, डॉक्टर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

Web Title:  Shiv Sena office bearers of Korchi and Desai Ganj in BJP's tent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.