प्रलंबित धान चुकाऱ्यांसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गाठले मंत्रालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:33 AM2021-08-01T04:33:45+5:302021-08-01T04:33:45+5:30
केंद्र शासनाच्या आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने देसाईगंज तालुक्यात खरेदी-विक्री संस्थेच्या माध्यमातून हमी भावाने ...
केंद्र शासनाच्या आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने देसाईगंज तालुक्यात खरेदी-विक्री संस्थेच्या माध्यमातून हमी भावाने धान खरेदी करण्यात आली. देसाईगंज खरेदी-विक्री संस्थेच्या कुरूड व कोरेगाव केंद्रावर १२ जुलैपर्यंत धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे जमा झाले. परंतु १४ जुलैनंतर धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे जमा झाले नाही.
(बॉक्स)
लोकमतने वेधले होते लक्ष
लोकमतने ‘१ हजार ७४६ शेतकऱ्यांना १३ कोटीपेक्षा जास्त रकमेच्या धान चुकाऱ्यांची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. सदर बातमीचा आधार घेत जिल्हा शिवसेना प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी ३० जुलै रोजी मंत्रालय गाठून अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे तात्काळ जमा करावे, अशी मागणी केली. यावेळी अन्न व नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्र्यांनी आठ दिवसात धानाचे चुकारे जमा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम उपस्थित होते.
300721\4535img-20210730-wa0043.jpg
जिल्हा शिवसेना प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी लोकमतच्या बातमीचा आधार घेत धानाच्या चुकाऱ्यांसाठी गाठले मंत्रालय !*