गडचिरोलीमध्ये दोन नगर पंचायतींवर शिवसेनेचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 04:37 PM2022-02-14T16:37:56+5:302022-02-14T16:42:43+5:30

आज गडचिरोलीमधील काही नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली असून उर्वरित ठिकाणी उद्या ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. 

Shiv Sena wins over kurkheda and mulchera Nagar Panchayat president election in Gadchiroli | गडचिरोलीमध्ये दोन नगर पंचायतींवर शिवसेनेचा झेंडा

गडचिरोलीमध्ये दोन नगर पंचायतींवर शिवसेनेचा झेंडा

Next

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा आणि कुरखेडा या दोन नगर पंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.  मूलचेरा नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचे विकास नेताम हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. तर कुरखेडा नगर पंचायतीमध्ये शिवसेनच्या अनिता बोरकर या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. 

गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकासकामांना जनतेने दिलेला हा कौल आहे. शेती, आरोग्य, दळणवळण, वीज पुरवठा, रोजगार या क्षेत्रात शिंदे यांनी जिल्हापातळीवर केलेल्या विकासकामांमुळेच शिवसेनेला हे मोठं यश मिळाले आहे. जिल्हा समन्वयक किरण पांडव आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यांच्या मेहनातीमुळे जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळत आहे. 'गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास मानून केलेल्या कामाला जनतेने दिलेली ही पोचपावती असून गडचिरोली जिल्ह्याला मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख पुसून काढण्याच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल असल्याचे' मत पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. 

आज गडचिरोलीमधील काही नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली असून उर्वरित ठिकाणी उद्या ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेने गडचिरोली सारख्या दुर्गम भागात मिळवलेले मोठे यश असून स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं शिवसेना तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली साकार होत असल्याबद्दल शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Shiv Sena wins over kurkheda and mulchera Nagar Panchayat president election in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.