भर पावसात धडकला शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:01 AM2018-08-21T00:01:34+5:302018-08-21T00:02:46+5:30

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या तसेच दिव्यागांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा काढण्यात आला.

The Shiv Sena's front is full of rains | भर पावसात धडकला शिवसेनेचा मोर्चा

भर पावसात धडकला शिवसेनेचा मोर्चा

Next
ठळक मुद्देमहिलांचाही सहभाग : निराधार व दिव्यांगांच्या हक्कांसाठी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या तसेच दिव्यागांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा काढण्यात आला. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार यांच्या मार्गदर्शनात माजी नगराध्यक्ष डॉ.अश्विनी यादव यांच्या नेतृत्वात महिला व शिवसैनिक जिल्हा कचेरीवर धडकले.
या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू कावळे, अशोक धोपडकर, शहर प्रमुख रामकिरीत यादव, नंदू कुमरे, घनश्याम कोलते, ज्ञानेश्वर बगमारे, योगेश गोनाडे, सुनंदा आतला, सुषमा राऊत, शकून नंदनवार, सीमा पराशर, तुळजा तलांडे, पंकज तटलावार, ताराबाई निकुरे, पांडुरंग निकुरे, डोमाजी कुंभारे, जानकीराम भुरसे, फातिमा शेख, अनिसा शेख, सुनीता टेकाम, शकुंतला भोयर, सुनीता मेश्राम, सुमन खेवले यांच्यासह शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
शिवसेनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. हे निवेदन अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी स्वीकारले. दिलेल्या निवेदनात संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन दरमहा दीड हजार रूपये करण्यात यावे, केंद्र सरकारच्या अनुदानाची रक्कम लवकर जमा करावी, दिव्यांगांना सोयीसवलती देऊन मानधन वाढविण्यात यावे, बँकेत वृद्ध निराधार व दिव्यांग बांधवांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
स्थानिक इंदिरा गांधी चौकातून शिवसेनेचा मोर्चा दुपारी १२ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. जिल्हा कचेरी परिसरात जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, डॉ.अश्विनी यादव, राजू कावळे आदींनी मोर्चेकºयांना संबोधित केले. सोमवारी सकाळपासूनच गडचिरोली शहरात मुसळधार पाऊस असतानाही शिवसेनेच्या या मोर्चात शिवसैनिकांसह निराधार योजनेचे लाभार्थी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Web Title: The Shiv Sena's front is full of rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.