सोमय्यांच्या अटकेसाठी शिवसेनेची गडचिराेली व आरमाेरीत निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 05:00 AM2022-04-08T05:00:00+5:302022-04-08T05:00:38+5:30
गडचिरोलीत जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वात, तर आरमोरी येथे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी निदर्शने करून सोमय्या यांचा निषेध केला. गडचिरोलीत सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाका, अशी मागणी करणारी तक्रार गडचिरोली पोलीस स्टेशनला देण्यात आली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली / आरमोरी : विक्रांत या युद्धनौकेसाठी जमा केलेला पैसा हा राजभवनात न पोहोचता तो भाजपचे नेते किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा निल यांनी परस्पर आपल्या निवडणुकीसाठी व बांधकाम व्यवसायात वापरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल आहे. त्यामुळे त्यांना ताबडतोब अटक करावी, या मागणीसाठी गडचिरोली आणि आरमोरी येथे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
गडचिरोलीत जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वात, तर आरमोरी येथे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी निदर्शने करून सोमय्या यांचा निषेध केला.
गडचिरोलीत सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाका, अशी मागणी करणारी तक्रार गडचिरोली पोलीस स्टेशनला देण्यात आली.
यावेळी वासुदेव शेडमाके यांच्यासह सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, विलास कोडाप, शहरप्रमुख रामकिरीत यादव, दीपक बारसागडे, राजू कावळे, पप्पी पठाण, अमित यासलवार, गजानन नैताम, नंदू कुमरे, अखाज शेख, अंकुश कुकावले, हेमंत चव्हाण, पूरब शील, अनुज तलांडे, सचिन राठोड, सागर भांडेकर, आदी अनेक पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.
काय आहे प्रकरण? सन २०१३ मध्ये ‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका वाचविण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम सुरू केली होती. लोकांनीही त्यासाठी सढळ हातांनी मदत केली. त्या रकमेतून ‘आयएनएस विक्रांत’ स्मारक स्वरूपात जतन करण्यासाठी तो निधी राजभवन येथे जमा केला जाणार होता; पण प्रत्यक्षात ती रक्कम राजभवनाला मिळालीच नसल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले. हा लोकांच्या देशप्रेमाशी खेळ असल्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी तक्रार शेडमाके यांनी गडचिरोली पोलिसांत केली.
आरमोरीत ‘हाय-हाय’चे नारे
आरमोरी येथे सोमय्या यांना अटक करा, भाजप सरकार हाय-हाय, असे नारे देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. साईमंदिर ते बसस्थानकापर्यंत शिवसैनिक, युवासैनिकांनी निषेध रॅली काढली. या वेळी सुरेंद्रसिह चंदेल यांच्यासह उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, युवासेनेचे जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, युवती सेना जिल्हाप्रमुख उमा चंदेल, न.प.चे बांधकाम सभापती सागर मने, रहात सय्यद, पायल तिरंगम, शहरप्रमुख भूषण सातव, लहानुजी पिलारे, विकास प्रधान, नंदू चावला, शैलेश चिटमलवार, फालू इन्काने, अक्षय धकाते, राजू ढोरे, पुरुषोत्तम कामतकर, ईश्वर कराणकर, मोतीलाल लिंगायत, शैलेश ढोरे व बरेच शिवसैनिक उपस्थित होते.