पोटाची आग शमविणाऱ्या शिवभोजनाने गरिबांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:35 AM2021-04-25T04:35:49+5:302021-04-25T04:35:49+5:30

आ.आत्राम यांनी अहेरीच्या शिवभोजन केंद्राला भेट देऊन शिवभोजन व्यवस्थेची पाहणी केली व शिवभोजन केंद्राच्या संचालिका तथा स्वयंसेवी संस्थेच्या अरुणा ...

Shiva food that quenches the fire of the stomach brings relief to the poor | पोटाची आग शमविणाऱ्या शिवभोजनाने गरिबांना दिलासा

पोटाची आग शमविणाऱ्या शिवभोजनाने गरिबांना दिलासा

Next

आ.आत्राम यांनी अहेरीच्या शिवभोजन केंद्राला भेट देऊन शिवभोजन व्यवस्थेची पाहणी केली व शिवभोजन केंद्राच्या संचालिका तथा स्वयंसेवी संस्थेच्या अरुणा गेडाम व अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोटाची खळगी भरण्यासाठी गरीब कुटुंबीय अहोरात्र मेहनत घेतात; पण कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने हाताला काम नाही, तर पोटाला अन्नही नाही अशी विदारक आहे. विपरीत स्थितीसाठी शिवभोजनच नवसंजीवनी ठरत आहे. महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन दरम्यान शिवभोजन मोफत व मुख्यतः थाळी व वेळ वाढवून दिल्याबद्दल धर्मरावबाबा आत्राम यांनी राज्य शासनाचे आभारही मानले. शिवभोजन केंद्रात भेटीप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम, तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, बबलू हकीम, सुरेंद्र अलोने उपस्थित होते.

===Photopath===

240421\24gad_2_24042021_30.jpg

===Caption===

शिवभाेजनाची पाहणी करताना आ. धर्मरावबाबा आत्राम.

Web Title: Shiva food that quenches the fire of the stomach brings relief to the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.