गरिबांच्या पाेटाची आग शिवभाेजन विझवीत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:37 AM2021-04-24T04:37:29+5:302021-04-24T04:37:29+5:30

आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरीच्या शिवभोजन केंद्राला शुक्रवारी भेट देऊन शिवभोजन व्यवस्थेची पाहणी केली व शिवभोजन केंद्राच्या संचालिका तथा ...

Shivbhajan is extinguishing the fire of the poor. | गरिबांच्या पाेटाची आग शिवभाेजन विझवीत आहे.

गरिबांच्या पाेटाची आग शिवभाेजन विझवीत आहे.

Next

आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरीच्या शिवभोजन केंद्राला शुक्रवारी भेट देऊन शिवभोजन व्यवस्थेची पाहणी केली व शिवभोजन केंद्राच्या संचालिका तथा स्वयंसेवी संस्थेच्या अरुणा गेडाम व अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोटाची खळगी भरण्यासाठी गरीब कुटुंबीय अहोरात्र मेहनत घेतात; पण कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने हाताला काम नाही, तर पोटाला अन्नही नाही अशी विदारक आहे. विपरीत स्थितीसाठी शिवभोजनच नवसंजीवनी ठरत आहे. महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन दरम्यान शिवभोजन मोफत व मुख्यतः थाळी व वेळ वाढवून दिल्याबद्दल धर्मरावबाबा आत्राम यांनी राज्य शासनाचे आभारही मानले. शिवभोजन केंद्रात भेटीप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम, तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, बबलू हकीम, सुरेंद्र अलोने उपस्थित होते.

Web Title: Shivbhajan is extinguishing the fire of the poor.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.